
बोरद Borad । वार्ताहर -
सातपुडा पर्वत (Satpuda mountain) रांगेत झालेल्या मुसळधार (Torrential) पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे गाव पाड्यापासून शहराकडे (From village to town) जाणारे अनेक कच्चे रस्ते (Raw roads) खचून गेले तर नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. नद्यांवर पूल नसल्याने अनेक गाव पाड्यांतील नागरिकांना (citizens) वाहत्या नदीतूनच (flowing river) जीवघेणा प्रवास (life-threatening journey) करावा लागत आहे.
सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील अलवान गृपग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या अक्राणी, केलीपाणी, थेवापाणी, बेडवाई (विहिरीमाळ) या गावांजवळील बोरवान नदी खळखळून वाहत आहे. या गावांना तळोदा तालुक्यात नेणारा प्रमुख मार्गावर बोरवान नदी येत असते. येथील नागरिक दरवर्षी होणार्या पावसाळ्यात बोरवान नदीमधून तब्बल एक किमी प्रवास करीत असतात. शहराकडे जीवनावश्यक वस्तू व दवाखान्यासाठी खाजगी वाहनाने गुडघ्या एवढ्या पाण्यात चार चाकी टाकून जीवघेणा प्रवास करीत असतात.
बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे बोरवान नदीदेखील खळखळून वाहू लागली. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला. परंतु तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अन्य मार्ग नसल्यामुळे तेथील लोकांना पावसाळ्यात पूराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागला. डोंगराळ भागातील लोकांना जीव धोक्यात टाकून असा प्रवास किती वर्ष करावा लागेल देवच जाणे? असा संतप्त प्रश्न तेथील नागरिकांनी व युवकांनी व्यक्त केला आहे.
तेथील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला रस्ते मंजुरीसाठी तसेच वाहतुकीयोग्य रस्ते होण्यासाठी लेखी निवेदन दिले आहे. परंतु तरीदेखील शासन व प्रशासन येथील ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाल्याचे ग्रामस्थांचे बोलणे आहे.
परिसरातील खराब रस्त्यांमुळे तसेच घाट रस्त्यांमुळे दुर्गम भागात अपघात होऊन एकाच वेळी 8 ते 9 प्रवासी मरण पावल्याची घटना अलीकडे घडल्या आहेत. असे असतानाही जीव धोक्यात घालून प्रवाशांसह थेट पुराच्या पाण्यातून गाड्या धावतात. तसेच रस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून देखील निकृष्ट दर्जाचे रस्त्यांची कामे होत असल्याची ओरड येथील नागरिक करीत आहेत. शासन व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ते बनवून देण्याची मागणी होत आहे.