लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन  गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी - Nandurbar

शहादा (Sahada) तालुक्यातील लोणखेडा चौफुलीवरून अल्पवयीन बालकाकडुन (minor child) २५ हजाराचे १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल (pistols) व जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Local Crime Investigation Branch) पथकाने जप्त केले.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या .

तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते . त्या अनुषंगाने दि.२ ऑक्टोंबर रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे गावठी कट्टा कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने त्यांनी शहादा पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेतील पोहवा दिपक गोरे , पोकॉ मोहन ढमढेरे , पोकॉ विजय ढिवरे यांचे पथक रवाना केले.

शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर जावुन संशयीत इसमाचा शोध घेतला असता एका बंद कोल्ड्रींक्सच्या दुकानासमोर एक अल्पवयीन मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात २५ हजार रुपये किमंतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक पिवळ्या धातुचे जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द शहादा पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही , असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे , पोलीस अमंलदार विजय ढिवरे यांनी केली आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com