नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमक

नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमक

नंदुरबार Nandurbar प्रतिनिधी

नंदुरबार नगरपालिकेची (municipality) सर्वसाधारण सभा (General meeting)शाब्दिक चकमक आणि आरोप प्रत्यारोप(Allegation rebuttal) होऊन मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली . कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन सभा झाली.त्यातच संतप्त विरोधी नगरसेवकांनी (Opposition corporators) सभात्याग केला . तथापि या गदारोळानंतर नगराध्यक्षा सौ . रत्ना रघुवंशी (Mayor Sou. Ratna Raghuvanshi) यांच्या अध्यक्षतेखाली 18 विषयांना मंजुरी (Approval) देण्यात आली .

नंदुरबार नगर परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली . सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र पवार उपस्थित होते . मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या जागी अभियंता गावित यांनी कामकाज पाहिले . संजय माळी यांनी इतिवृत्त वाचून सभेला प्रारंभ केला . शहराच्या मंजूर विकास योजनेतील नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर 10,99 चे शाळेसाठी असलेले क्षेत्र प्राथमिक वाणिज्य प्रयोग करण्याबाबत निर्णय घेण्यात आला .

रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल शर्मा ते उत्तरेस रेल्वे रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामासाठी 18 लाख 87 हजार 865 रुपये अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली . नंदुरबार नगर परिषद हद्दीतील मोकाट गुरे पकडली त्यांची कोंडवाड्यात वाहतूक करण्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली . प्रभाग क्रमांक तीन मधील मोहन ट्रेडर्स पासून नगर पर्यंत तसेच रामकृष्ण नगर या भागात रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी 49 लाख 74 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली . आदी विषयांवर चर्चा करण्यात आली .

शेवटी नगरपालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षां ऐवजी सत्ताधारी नगरसेवक बोलत असल्याच्या कारणावरून नगराध्यक्षा यांचा अवमान होत असल्याचे सांगून सभात्याग करीत दालना बाहेर निघून गेले .

शहरातील मोकाट गुरांमुळे व्यापार्‍याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करीत विरोधी पक्षाचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर आणि प्रशांत चौधरी यांनी सभाग्रहात गदारोळ केला . यावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पालिकेसह नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे सांगितले .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com