तळोदा येथे 100 वर्षीय आजीबाईने घेतली लस

तळोदा येथे 100 वर्षीय आजीबाईने घेतली लस

मोदलपाडा - Modalpada - वार्ताहर :

तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या समुपदेशनाने बोहरी समाजाच्या 50 नागरिकांचे लसिकरण करण्यात आले असून 100 वर्षीय आजीनेही लस घेतली आहे.

तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयामार्फत गावात लसिकरणाबद्दल मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करण्याचे काम करण्यात येत आहेत. आधीच करोनाबद्दल असलेले ग़ैरसमझ त्याचबरोबर लसीकरणासाठी नकारात्मक प्रतिसाद नागरिकांमधे मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यात लोक सहज लसिकरणासाठी दवाखान्यात येत नाहीत. आज कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेले आहे त्यातून बचावासाठी लसीकरण महत्वाचे आहे, हीच गोष्ट मनावर घेवून समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.रामचंद्र परदेशी जाणीवजागृतीचे काम विद्यार्थी हितेश साळी याच्यासोबत करत आहेत.

रमजान महिना संपला आहे. त्यात त्यांनी बोहरी समाजाच्या मशिदमधे जावून लसीकरण करणे किती महत्वाचे आहे, लसीकरणाचे फायदे आदी गोष्टी टेक्नोसॉल्विंग योगेश सोनवणे, प्रा.रामचंद्र परदेशी यांनी समजावून सांगितले.

त्याचे फळस्वरूप आज उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे 50 नागरिकांनी लसीकरण केले. यात आस्माबाई अलीहुसेन बोहरी या 100 वर्षीय आजीबाईचाही समावेश आहे. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, विशाल चौधरी, तुषार चौधरी, विजय चौधरी यांनी सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com