जिल्हयात दोन दिवसात 55 हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्हयात दोन दिवसात 55 हजार नागरिकांचे लसीकरण

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

कोविड (Covid) संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेचा (third wave) प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Preventive vaccination) गती देण्यासाठी 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व बँक, टपाल कार्यालय आणि शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयामध्ये प्रवेशापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक (Required) आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री (District Magistrate Manisha Khatri) यांनी दिले आहेत. दरम्यान, प्रशासनाने राबविलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत गेल्या दोन दिवसात राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत (Special vaccination campaigns) जिल्हयातील 55 हजार 698 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांनी कोविड -19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. जे विद्यार्थी, विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही. त्यांच्याकरिता विद्यापीठाचे संबंधित संस्थाचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडून स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण पुर्ण करुन घ्यावे. बँक व पोस्टाच्या ठिकाणी जे नागरिक भेट देणार आहेत. त्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना लसीकरण केल्यानंतर प्रवेश देण्यात येईल. बँक व्यवस्थापक तसेच पोस्ट प्रमुख बँक व टपाल कार्यालयाच्या जवळच्या लसीकरण केंद्रात जावून नागरीकांना लसीकरणाबाबत निर्देश द्यावेत.

शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह, फटाके विक्री स्टॉलच्या ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी लसीकरण केले नसेल त्यांना प्रवेश देण्यात येवू नये. त्यासाठी त्यांना लसीकरणासाठी निर्देश देण्यात यावेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पथकांद्वारे बँक व टपाल, महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आणि बंदिस्त सभागृह येथे अचानक तपासणी करण्यात येईल. व आदेशाचे उल्लंघन आढळल्यास जबाबदार धरण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हयात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने दि.2 व 3 नोव्हेंबर विशेष कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसात 55 हजारावर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. काल दि. 2 नोव्हेेंबर रोजी 31 हजार 698 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तर आज दि.3 नोव्हेंबर रोजी 24 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयाचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी या विशेष लसीकरणबाबत जनजागृती केली होती. व जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने विशेष लसीकरण मोहिम यशस्वी झालेली दिसून आली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com