उमराणी येथे लाभार्थ्याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीकडून घरकुलाचे अनुदान हडप

लाभार्थ्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा संबंधीत यंत्रणेचा प्रताप, प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष!
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas Yojana

नंदुरबार |NANDURBAR | प्रतिनिधी

उमराणी (Umrani) बु.ता.धडगाव येथे प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) घरकुल न बांधता (Without building a house) लाभार्थ्याच्या नावाने (name of the beneficiary) दुसर्‍याच व्यक्तीकडून (another person) अनुदान हडप (Grant grab) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे ज्यांच्या नावे अनुदान हडप करण्यात आले आहे, त्या लाभार्थ्यांना याबाबत कुठलीही माहिती नसून त्यांच्या नावाने सेंट्रल बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्हयात अशाप्रकारे हजारो लाभार्थ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन कोटयावधींचे अनुदान हडप करण्यात आल्याचे समजते. यात ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत मोठी साखळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, असे असतांना गैरव्यवहार करणार्‍या साखळीवर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्या नावावर अनुदान हडप करण्यात आले आहे, त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन त्यांच्याकडून सदर रक्कम वसुल करण्याचा इशारा संबंधीत प्रशासकीय यंत्रणेने दिला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. मात्र, ही योजना काही लोकांसाठी अनुदान हडप करण्याचे साधन बनली आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा सर्वे करुन त्यांना घरकुले मंजूरी केली जातात. मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्य बँक खात्यात सदर अनुदान वर्ग करण्यात येते. मात्र, या योजनेबाबत दुर्गम भागात भलताच प्रकार उघडकीस आला आहे.

लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न देता त्यांचे नाव वापरुन, त्यांच्या नावे बँकेत बनावट खाते उघडून दुसराच व्यक्ती अनुदान लाटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढा मोठा गैरव्यवहार हा कोण्या एकटयादुकटयाचे काम नसून यात ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत साखळी कार्यरत असल्याचे यानिमित्ताने चर्चीले जावू लागले आहे.

उमराणी बु. ता.धडगाव येथील सात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांना घरकुलाचा कुठलाही लाभ देण्यात आला नाही. त्यांच्या नावाने घरकुल मंजूर होवून अनुदानही हडप करण्यात आले आहे.

मात्र, हा गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी धडगाव येथील संबंधीत यंत्रणेने ज्या लाभार्थ्यांच्या नावावर अनुदान हडप करण्यात आले त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. त्या लाभार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्या नोटीसीत म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजना पीडब्ल्यूएल यादीत घरकुल मंजूर असून पक्के घर बांधकामासाठी आपल्याला टप्याटप्याने अनुदान वितरण करण्यात आले आहे. परंतू आपण घरकुलाचे बांधकाम न करता दुसर्‍याच्या मालकीचे घरकुल दाखवून घरकुल बांधकामाची बतावणी करून अनुदानाचा गैरवापर केला आहे.

ही बाब कठोर कारवाईस पात्र आहे. अनुदानाचा गैरवापर केला म्हणून धडगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करून दिलेले अनुदान एकरकमी वसूल का करण्यात येऊ नये? अशी कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत तीन दिवसात खुलासा करावा करण्याचे आदेश दि.४ नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते.

Pradhan Mantri Awas Yojana
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

याबाबत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी ऍड.बी.व्ही.खानोलकर यांच्याकडे संबंधीत नोटीस बजावलेल्या लाभार्थ्यांनी तक्रार केली. त्यात त्यांच्या नावे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झाले आहेत,

परंतू प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळाला नाही. तसेच त्यांच्या नावाने बँकेत खोटी कागदपत्रे सादर करुन खाते उघडण्यात आली आहेत. लाभार्थी येथे नसतांना बँकेत खाते कसे व कोणी उघडले याबाबत चौकशी करुन आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

या तक्रारीची दखल घेवून ऍड.खानोलकर यांनी चौकशी केली असता भयंकर प्रकार उघडकीस आले आहेत. लाभार्थ्याचे कच्च्या घराचे योग्य फोटो संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. नवीन जागा घरापासून १५ फुट अंतरावर आहे.

तेथे लाभार्थ्याच्या पत्नीचा फोटो आहे. हे दोन्ही फोटो योग्य आहेत. मात्र, लिंटल लेव्हल, प्लिथं लेव्हलचा फोटो धडगाव तालुक्यातील असून काम पूर्ण झाल्याचा फोटो लहान उमराणी येथील मंदिराजवळचा आहे. मात्र, पूर्ण झालेले घरकुल दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे आहे. अशाचप्रकारे इतर सर्वच लाभार्थ्यांबाबत घडले आहे.

याशिवाय या लाभार्थ्यांच्या नावे मांडवी ता.धडगाव येथील सेंट्रल बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहे. बँकेत खाते उघडतांना तेथे देण्यात आलेले फोटो ज्या इसमांचे आहेत त्यांचाही तपास लागला आहे. यासह विविध परिपूर्ण बाबींचा तपास ऍड.खानोलकर यांनी लावला असून संबंधीत प्रशासकीय यंत्रणेला अहवाल सादर करण्यात आला आहे.

यात दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या गैरव्यवहाराबाबत संबंधीत यंत्रणा काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'

जिल्हयात ४५ हजार बोगस लाभार्थी?

दरम्यान, उमराणी बु. येथे घरकुल अनुदानाचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात हा हा घोटाळा मोठया प्रमाणावर असून त्याची संख्या ४५ हजारावर असल्याची शक्यता आहे. त्यामुळे का गैरव्यवहार कोटयावधींच्या घरात असल्याचे समजते.

दि.१८ ऑक्टोबर रोजी काल्लेखेतपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी काही ग्रामस्थांकडून घरकुलाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यातील काही प्रकरणे अत्यंत गंभीर होती. तक्रारदारांच्या नावाचा वापर करुन मांडवी येथील सेंट्रल बँकेत बनावट खाते उघडून दुसर्‍याच व्यक्तीने घरकुलाचे अनुदान हडप केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी व खर्‍या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.

ऍड.बी.व्ही.खानोलर, कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com