सोशल मिडियाचा वापर जपूनच करा-आ.राजेश पाडवी

तळोदा येथील पोलीस ठाण्यातर्फे शांतता कमिटीची बैठक उत्साहात
सोशल मिडियाचा वापर जपूनच करा-आ.राजेश पाडवी

मोदलपाडा (Modalpada) ता.तळोदा । वार्ताहर

अक्कलकुवा येथील सोशल मीडियावरील (social media) मेसेजच्या (messages) घटनेची मुस्लिम धर्मियांचा (Muslims) काहीच संबंध नव्हता शिवाय या घटनेला कोणीही समर्थन दिले नसतांना काही समाजकंटकांनी शांतता भंग (Disturbance of peace by rioters) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना निंदनीय (incident is reprehensible) आहे परंतु आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता पडताळत नाही.त्यामुळे आपण सोशल मिडियाचा वापर जपूनच करण्याचे आवाहन आ. राजेश पाडवी (MLA. Rajesh Padvi) यांनी केले.

तळोदा येथील पोलीस ठाण्यातर्फे शांतता कमिटीची बैठक (Peace Committee Meeting) घेण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ.राजेश पाडवी होते यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार गिरीश वाखारे, पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, कैलास चौधरी उपस्थित होते. यावेळी आ.राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, सोशल मीडियावरील व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर कंट्रोल आणला पाहिजे कारण भविष्यात व्हाटसअ‍ॅप हे घातकच ठरणार आहे. व्हाटसअ‍ॅप आलेली आक्षेपार्ह पोस्ट (Offensive post) पोलिसांना किंवा लोकप्रतिनिधीना त्वरित सांगितले पाहिजे. तरच अश्या विघातक शक्तींना वेळीच ठेचता येईल.

याशिवाय शांतता कमिटीच्या सदस्यांनीही सोशल ग्रुप वर लक्ष दिले पाहिजे असे सांगून लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल दिल्यानंतर आपण त्याकडे ही लक्ष देण्याचे आ.पाडवी यांनी सांगितले यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी कोरोना महामारीत आता आपण जेमतेम सावरतो आहे आपलं शहर कसे शांत राहील याची जबाबदारी सर्वांनीच ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे, प्रगतिशील शेतकरी निसार मकराणी, कैलास चौधरी, केसरसिंग क्षत्रिय, विजय सोनवणे,जालिंधर भोई, यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीस नगरसेवक अमानुद्दीन शेख, शिरीष माळी,मुकेश जैन, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील आदींसह तळोदा शहरातील नागरिक उपस्थित होते.

गैरहजर राहणार्‍या सदस्यांबाबत नाराजी

पोलीस ठाण्याकडून शांतता कमिटी शहराची समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत अनेकब सदस्यांना समाविष्ट केले आहे. तथापि बहुतेक सदस्य हे बैठकीला हजर राहत नाही. याबाबत खुद बैठकीच्या वेळेही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.वास्तविक तळोदा शहरातील शांततेसाठी शांतता कमिटीतील सदस्यांची भूमिका अहम असते. पण कमिटीतील सदस्य याकडे गांभीर्याने लक्ष घालत नाही तेव्हा पोलीस प्रशासनाने अश्या उदासीन सदस्यांना बाजूला सारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com