
चिनोदा ता.तळोदा । Chinoda। वार्ताहर
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे टरबूज पिकाची (watermelon fruit) लागवड करण्यात आली असून मात्र टरबूज पिकावर विविध किंडी व अळींचा प्रादुर्भाव (Infestation of various nits and worms) होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून आगोदर चिनोदा येथील टरबूज उत्पादक शेतकरी विलास त्र्यंबकराव मराठे या शेतकर्याने टरबूज पिकात कामगंध सापळे (Odor traps) लावण्यात आले होते. या लावलेल्या कामगंध सापळ्यामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत असते. तर रांझणी येथील शेतकरी महेंद्र भारती या शेतकर्यांने आपल्या मिरची पिकावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जुन्या साड्यांचे पडदे बांधून उपययोजना केली होती.
चिनोदासह परिसरात टरबूजचे बर्यापैकी उत्पादन घेतले जाते. टरबूज पिकाला उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश तसेच कोरडे हवामानाची आवश्यकता असते. टरबूज पिकाची साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान टरबूजाची लागवड करण्यात येत असते. मात्र चिनोदा परिसरातील शेतकर्यानी सप्टेंबर महिन्यात टरबूज पिकाची लागवड केली असून सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या टरबूज पिकाला साधारणतः अडीच ते तीन महिन्यानंतर टरबूजला चांगला दर मिळतो असे शेतकर्यांकडून सांगण्यात आले.
चिनोदा, रांझणी परिसरात टरबूज, सोयाबीन, डांगर, मिरची आदी पिकांची लागवड करण्यात आली असून परतीचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे टरबूज पिकावर विविध किंडीचा प्रादुर्भाव होऊ नये. तसेच सद्यस्थितीत टरबूजाची फळधारणा सुरू झाली असून या टरबूज फळधारणेवर किंवा फळावर किडींनी डंक मारले तर ते फळ निकामी होते किंवा फळाचे व्यवस्थित पोषण न होता त्या फळाचा पाहिजे तेवढा आकार होत नाही व फळाची वाढ खुंटते. व त्या फळाला व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करतात.
म्हणून शेतकर्यांकडून आता टरबूज फळधारणेवर किंडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ट्रॅप ग्लास (मक्षिकारी कुटील कीटनियंत्रण) लावण्यात आले असून या ट्रँप ग्लासमध्ये सुंगधीत चौकोनी गोळी ठेवलेली असते. या सुंगधीत गोळीचा वासाने कीडीं या ट्रॅप ग्लासकडे आकर्षित होतात आणि या ट्रँप ग्लासमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात.
त्यामुळे किडींचा फळावर प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. म्हणून टरबूज उत्पादक शेतकर्याकडून टरबूज फळावर किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रॅप ग्लासचा उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
टरबूज पिकावर विविध किंडी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अगोदर कामगंध सापळे लावण्यात आले होते. मात्र आता टरबूज पिकाची फळधारणा होत असून फळावर किंडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रॅप ग्लासचा उपाय करण्यात आला आहे.
- विलास मराठे, टरबूज उत्पादक शेतकरी,चिनोदा