आगामी जि.प.पदाधिकारी महाविकास आघाडीचेच

आ.शिरीषकुमार नाईक, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती
महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही घटक पक्ष एकसंघ (union) असल्याने पुढील महिन्यात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापती निवडीप्रसंगी महाविकास आघाडीचीच सत्ता राहील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.शिरीषकुमार नाईक (Congress district president MLA Shirish Kumar Naik) व शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी (Shiv Sena leader former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी संयुक्त पत्रान्वये दिले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुलै महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करुन पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व पंचायत समिती सभापती, उपसभापतीची निवड करतांना महाविकास आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तीनही पक्ष अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीचेच होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com