रजाळे येथे अवकाळीचा तडाखा

शेतकर्‍याच्या घराचे छत उडाले, विद्युत पुरवठा अनेक तास बंद
रजाळे येथे अवकाळीचा तडाखा

नंदुरबार - Nandurbar

तालुक्यातील रजाळेसह परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदल झाल्याने वादळासह अवकाळी पाऊस  बरसला. यामुळे घरांची पत्रेही उडाले असून मोठे अनर्थ टळले आहे. सोसाट्याचा वारा असल्याने झाडेदेखील उन्मळून पडली तर विद्युत पुरवठाही अनेक तास बंद होता. या वादळामुळे एका शेतकर्‍याचे राहत्या घराचे पत्रे उडून 20 ते 25 हजारांचे नुकसान झाले.  

कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे शेतकरी पुरता बेहाल झाला आहे. एकीकडे कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून ते सावरत नाही तोवर अवकाळीचा तडाका यात शेतकरी चांगलाच होरपळला जात आहे. नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्यातील गावांमध्ये आज अवकाळीने चांगलाच धुमाकूळ घातला. यात रजाळे, शनिमांडळ, बलवंड या परिसरात अचानक दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास पावसाचे वातावरण निर्माण झाले.

काही मिनीटातच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शेतकर्‍यांसह अनेकांची चांगलीच धावपळ उडाली. वादळामुळे घराचे छत दूरपर्यंत उडाले. यात रामभाऊ भिला मराठे यांच्या राहत्या घराचे पत्रे दूरपर्यत उडाल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. यावेळी परिसरातील युवकांनी मदतकार्य करीत उडालेले पत्रे जागेवर ठेवण्यास मदत केली. तसेच वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर गावातील विद्युत पुरवठा अनेक तास बंदच होता.

अचानक आलेल्या या पावसामुळे गुरांसाठी साठवलेल्या चार्‍याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकर्‍यांचे उन्हाळी कांदा, भुईमुग, मका काढण्याचे कामेही अंतिम टप्यात असल्याने त्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे शेतकरी रामभाऊ मराठे यांच्या घराचे पत्रे उडाल्याने तलाठी संदिप शिंदे यांनी त्वरीत घटनेचा पंचनामा केला आहे.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा पाटील, पोलिस पाटील वंदना पाटील, डॉ.शंकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करून संबंधितांना पंचनामा करून त्वरीत भरपाई देण्यात यावी. झालेल्या पंचनाम्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल शासन दरबारी पाठवुन शक्य तेवढ्या लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

Related Stories

No stories found.