शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले

पिकांचे अतोनात नुकसान
शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले

शहादा Shahada l ता. प्र.

तालुक्यात म्हसावद व चिखली ग्रामीण भागातील परिसरात आज पुन्हा सायंकाळी सव्वा सहा वाजेपासून वादळी वाऱ्यांसह (Unseasonal rain) जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होऊन पुन्हा शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात (damage to crops) नुकसान झाले असून अक्षरशः गल्लीबोळांमध्ये ओसांडून पाणी वाहत होते.गेल्या पंधरा दिवसात चौथ्यांदा पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे दरम्यान शहरातही विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला .

तालुक्यातील म्हसावद परिसरातील चिखली कुढावद, पाडळदा,जावदा, वैजाली, राणीपूर या गावांमध्ये वादळीवारे विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला.गल्लीबोळांमध्ये रस्त्यांवर पाणी वाहत होते.शेतकऱ्यांची धावपळ उडाली.शेतातील उभा असलेला गहू पूर्णता खाली पडला.केळी,पपई, हरभरा व मिरची या पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे.ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांमुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला होता.

शहादा शहरात रात्री उशिरा सात वाजता विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली.जोरदार वाऱ्यांमुळे शहरातील छोट्या व्यवसायिकांची धावपळ उडाली.सायंकाळी दूध विक्री करणाऱ्यांचेही हाल झाले.हातगाड्यांवर शितपेय आईस्क्रीम विक्री करणाऱ्यांची चांगलीच फजिती झाली.शासकीय विश्रामगृहा जवळ भाजी विक्रेत्यांची पावसामुळे व वाऱ्यांमुळे तारांबळ उडाली.उशिरा रात्री शहरात पावसाची रिप-रिप सुरू होती.एकंदरीत हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com