नवापूर पालिकेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड

सभापतीपदी मंगला सैन, सविता नगराळे, हारुण खाटीक, महिमा गावित यांची निवड
नवापूर पालिकेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड
MANGALA SAIN

नवापूर | श.प्र. - NAVAPUR

नवापूर पालिकेच्या सभागृहात स्थायी समिती व विषय समिती सभापतीची निवडणूक पिठासिन अधिकारी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

SAVITA NAGARALE
SAVITA NAGARALE

यावेळी सर्व विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

MAHIMA GAVIT
MAHIMA GAVIT

सकाळी १०.४५ वाजता मुख्यधिकारी विनायक कोते यांच्या दालनात सभापती पदासाठी उमेदवाराचे नामांकन दाखल करण्यात आले.त्यानंतर विर एकलव्य सभागृहात सभापती पदाची निवडणूक पार पडली. त्यात बांधकाम समिती सभापतीसाठी सौ. मंगला विजयकुमार सैन यांचा एकच अर्ज दाखल असल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

आरोग्य सभापती पदासाठी सविता मनोहर नगराळे यांचा एकच अर्ज असल्याने त्याही बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत करण्यात आले.

नियोजन व विकास समितीच्या सभापती हे पदसिद्ध असल्याने उपनगराध्यक्ष त्यांचे सभापती आहेत.

पाणीपुरवठा समिती सभापतीसाठी हारुण शब्बीर खाटीक यांचा एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी महिमा नितेश गावीत यांचा एकच अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी विनायक कोते, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, वरिष्ठ लिपिक अशोक साबळे उपस्थित होते.

सदर नवनियुक्त विषय समिती सभापती बिनविरोध निवडून आल्यानंतर पीठासन अधिकारी तहसीलदार मंदार कुलकर्णी, नगराध्यक्ष हेमलता पाटील, मुख्याधिकारी विनायक कोते यांनी त्यांचा सत्कार केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com