शहाद्यात बुधवारपासून रंगणार विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव

एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, तयारी पूर्ण
शहाद्यात बुधवारपासून रंगणार विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव

शहादा | ता.प्र.- SHAHADA

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) जळगांवच्या विद्यार्थी विकास विभाग (Student Development Department) व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय (College of Pharmacology and Senior College of Arts, Science and Commerce) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ ते २३ एप्रिल दरम्यान युवक महोत्सव (youth festival) रंगणार असून विद्याश्रम परिसरात होणार्‍या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२२ ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या महोत्सवात सुमारे एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी (Student) व विद्यार्थिनी आपले कलागुण सादर करणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही विशेष संकल्पना या महोत्सवात राहील.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातर्फे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या (Pujya Sane Guruji Vidya Prasarak Mandal) औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय तसेच कला,विज्ञान व वाणिज्य वरीष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९ ते २३ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यशस्वीतेसाठी विविध समित्या (Various Committees) प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, उद्या दि.१९ सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संघांचे आगमन व नोंदणी होणार आहे.

२० एप्रिलला उद्घाटन

२० एप्रिलला सकाळी ८ वाजता युवक महोत्सव युवारंगचे उदघाटन (Inauguration) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी (Vice Chancellor Prof.Dr.V.L. Maheshwari) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील (President Deepak Patil) उपस्थित राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीर्श पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

पाच रंगमंचांवर सादर होणार युवा महोत्सव

उद्घाटनानंतर एक खुल्या व चार बंदिस्त रंग मंचांवर (Theater) सलग तीन दिवस विविध महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी आपले कलागुण सादर (Art qualities) करतील. एकाच वेळी पाच रंगमंचावर कलाकृती सादर होणार आहेत.त्यासाठी रंगमंच क्रमांक एक स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब पी.के.पाटील, रंगमंच क्रमांक दोन बाल हुतात्मा शिरीषकुमार, रंगमंच क्रमांक तीन बाल हुतात्मा लालदास, रंगमंच क्रमांक चार वीर भगतसिंग, रंगमंच क्रमांक पाच वीर बिरसा मुंडा असे पाच रंगमंच उभारण्यात आले आहेत. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या रंगमंचांवर विडंबन नाट्य, मूकनाट्य, समूह लोकनृत्य, भारतीय लोकगीत, सुगम गायन, समूहगीत, शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, काव्यवाचन, वाद-विवाद, वक्तृत्व, शास्त्रीय वादन, भारतीय सुगम गायन, शास्त्रीय गायन, फोटोग्राफी, रांगोळी, व्यंगचित्र, कोलाज, क्ले मोडेलिंग, स्पॉट पेंटिंग, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी आदींसह विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले जाणार आहे.

१९ समित्या कार्यरत

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील आणि शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पवार, युवक महोत्सव समन्वयक डॉ.आय.जे.पाटील, यांनी विविध समित्यांची (various committees) स्थापना केली आहे. समिती प्रमुखांसह प्रत्येकी दहा ते पंधरा सदस्यांच्या एकूण १९ समित्या बनविण्यात आल्या आहेत. यात स्वागत, नोंदणी, निवास, भोजन ,शिस्त, रंगमंचावर संचलन, छायाचित्रण, विद्युत पुरवठा, वाहनतळ आदी समित्यांचा समावेश आहे.

मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे थांबला तो संपला हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या विविध ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. विद्यापीठाने ह्यावर्षी विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालय युवक महोत्सव युवारंग २०२१ ची जबाबदारी आमच्या दोन्ही महाविद्यालयांना सोपवली असून ती यशस्वीपणे पार पाडली जाईल.

- दीपक पाटील, अध्यक्ष - पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com