खोकसा घाटात मिक्सर मशिन उलटल्याने दोन महिला मजूरांचा जागीच मृत्यू

 खोकसा घाटात मिक्सर मशिन उलटल्याने दोन महिला मजूरांचा जागीच मृत्यू

नवापूर | श.प्र. NAVAPUR

तालुक्यातील खोकसा घाटात (Khoksa Ghat) मजूर घेऊन जाणार्‍या पिकअप गाडीचा ब्रेक न लागल्याने अपघात झाला. अनियंत्रित वाहन व मिक्सर मशीन (mixer machine) तीव्र उतारावर २०-२५ फुट उंचीवरून खालील रस्त्यावर उलटल्याने (overturned) भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनाखाली मजूर दाबले गेल्याने २ महिलांचा (women) जागीच मृत्यू (died) झाला तर १३ मजूर जखमी झाले आहेत. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रात्री बारा वाजेच्या सुमारास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

दि.३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खोकसा घाटातील रस्त्यावर हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर खोकसा गावाचे पोलीस पाटील सुनील गावित व गावकरी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

पोलीस पाटील सुनील गावित यांनी १०८ रुग्णवाहिका व विसरवाडी पोलीसांना माहिती देताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू केले.

घटनेमुळे रात्रीच्या वेळी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयराज कुवर, परिचारिका स्नेहा पाडवी, सालविना वळवी, कीर्तेश चव्हाण, सुरेखा बागुल यांनी अपघातग्रस्त मजुरांवर उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल हलविण्यात आले.

नंदुरबार तालुक्यातील नवागाव (खांडेपाडा), नवापूर तालुक्यातील बिजादेवी येथील बांधकाम व्यवसायिक मजूर हे साक्री तालुक्यातील खैरखुटा येथे घर बांधकामाचे स्लॅब भरून मजुरांसह मिक्सर मशिन पिकअप गाडी (क्रमांक एम एच ०४ जी आर १८७९) वरील चालकाने

त्याचा ताब्यातील सिमेन्टच्या महिंद्रा पिकअप गाडीस धडक देवून जात असतांना खोकसा गावाच्या घाटात अचानक हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या अपघातात खांडेपाडा ता. नंदुरबार येथील १६ मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघात एवढा भीषण होता की यात पिकअप वाहन पलटी झाल्यावर वाहनात बसलेले जवळपास १६ व्यक्ती व महिला मजूर पिकअप वाहनाखाली दाबले गेले. यात पिकअप वाहन व स्लॅप बांधकाम मशीन चक्काचूर झाले होते.

घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल हिंदुस्तान नाईक, हेमंत खाडे, राजू कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त पिकअप वाहनाला जेसीबीच्या साह्याने बाजूला करून अपघातात जखमी असलेल्या मजुरांना १०८ रुग्नेवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले तसेच अपघात ग्रस्त वाहनास बाजूला केले अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

या अपघाताच्या बाबतीत मनेश मोहन गावीत यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात वाहन चालक पुनमचद्रा अमरसिंग गावीत यांच्याविरुद्ध भादंवि. कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८,४२७ मो. के. ऍक्ट कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com