रस्त्यावर दुचाकी आडव्या लावून ट्रक चालकांना मारहाण करीत लुटले

तीन जणांना अटक, नंदुरबार ते निझर रस्त्यावरील घटना
रस्त्यावर दुचाकी आडव्या लावून ट्रक चालकांना मारहाण करीत लुटले

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

नंदूरबार ते निझर रस्त्यादरम्यान (Sudarshan Petrol Pump) सुदर्शन पेट्रोल पंपाच्या पुढे रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन मालट्रकांवर (truck) दगडफेक व मारहाण करीत दहशत निर्माण करून ट्रकचालकांना जबरीने लुटल्याची घटना घडली. या मारहाणीत दोन ट्रकचालक जखमी झाले.

याप्रकरणी उपनगर (police) पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार ते निझर रस्त्यावर असलेल्या सुदर्शने पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर दि.४ मार्च रोजी मध्यरात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध मोटारसायकली आडव्या उभ्या करुन सहा जणांनी मालट्रकांवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली.

या दगडफेकीत मालट्रक ( क्र.एम.एच.१९ सी.वाय.७३८५), मालट्रक (क्र.एम.एच.४१ए.यु.२ ९ ३८), मालट्रक (क्र.एम.एच.१८ ए.एन.८६८६), मालट्रक (क्र.एम.एच.१८ ए.ए.९ ५२६). मालट्रक (क्र.एम.एच.१५ जी.व्ही.८७ ९ ५) या पाच ट्रकांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.

तसेच ट्रकांवरील चालक सहचालकांना हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. चालक सुरेश बाबुलाल राठोड यांच्या खिश्यातुन २ हजाराची रोकड व ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने चोरुन नेला आहे. या मारहाणीत सुरेश बाबुलाल राठोड रा.जळगांव, पंकज शालीक चव्हाण रा.मालेगाव हे दोघे ट्रकचालक जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुरेश बाबुलाल राठोड रा.सुभाषवाडी, जळगाव यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात बादल रमेश वळवी, राकेश राजु भिल, राजु सुरेश भिल, सनी राजु शिंदे चौघे रा.एकतानगर, नंदूरबार व दोन अल्पवयीन युवक अशा सहा जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३४१, ३२४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील

राकेश राजु भिल, राजु सुरेश भिल, सनी राजु शिंदे या तिघांना पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com