नवापूर येथे भीषण अपघातात दोन गंभीर जखमी

नवापूर येथे भीषण अपघातात दोन गंभीर जखमी

नवापूर Navapur । श.प्र.-

शहरालगत असलेल्या नेहरू उद्यानच्या पाठीमागे राष्ट्रीय महामार्ग क्र 6 (National Highway No.6) वरील वळण रस्त्यावर (winding road) भीषण अपघात (terrible accident) होवून दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली. अनेक निर्दोष लोकांचा बळी घेणार्‍या ह्या वळण रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाकडून (National Highways) उपाययोजना केल्या जात नाही. वाहन धारकांना वळण रस्ता लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. याबाबत उपाययोजना (Measures) करण्याची मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.9 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरतकडून पिंपळनेरकडे जाणारे बोलेरो वाहन (Bolero vehicle) रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला (Divider) धकडल्याने मोठा अपघात (accident) झाला.

या अपघातात पिंपळनेर येथील मीनल चव्हाण व चैतन्य असे दोन जण गंभीर जखमी झाले. एकाचा पायाला तर दुसर्‍याच्या डोक्याला दुखापत (seriously injured) झाली आहे. घटनेच्या काही अंतरावर असलेल्या बाबा रामदेव हॉटेलचे संचालक सजन राजपुरोहित, आणि बसलेले नवापूर शिवसेने चे पदाधिकारी मनोज बोरसे, आबा मोरे, दर्शन पाटील, अजय सैन,भूषण सांगळे, तसेच नवापूर येथील सलिम मंसुरी, डॅनियल वसावे आदींनी जखमीना आपल्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात (Sub-district hospital) दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. तरुणांनी जखमींना वेळीच रुग्णालयात नेल्याने त्यांनी जखमींना (seriously injured) जीवदान मिळाले. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली असई जगदीश सोनवणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.