उज्जेनला जाणार्‍या भाविकांच्या कारला अपघात, दोन ठार, एक जखमी

उज्जेनला जाणार्‍या भाविकांच्या कारला अपघात, दोन ठार, एक जखमी

नवापूर Navapur। श.प्र.

नवापूरहून उज्जेन (Ujjain) येथील महाकाल मंदिरात (Mahakala temple) जाणार्‍या भाविकांची कार (Devotee's car) झाडाला धडकली (Hit the tree). या घटनेत दोन भाविक ठार (Killed) झाले असून एक जण जखमी झाला. मयतात नवापूरातील एकाचा समावेश आहे.

उज्जैन महाकाल मंदिरात (Mahakala temple) दर्शनासाठी गेलेल्या गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविकांची कार मंगळवारी सकाळी पांथपिपलाई ते रामवासाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला जाऊन झाडाला धडकली (Hit the tree). अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण भागातील अनेक लोक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी डायल 100 वर माहिती दिली. त्यानंतर अपघाताची (accident) माहिती नानाखेडा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

तिघांनाही रुग्णवाहिकेने (ambulance) जिल्हा रुग्णालयात (district hospital) पाठवले असता कारमधील 3 पैकी 2 जणांचा मृत्यू (Death) झाला. डॉ.जितेंद्र शर्मा यांनी सांगितले, सकाळी आलेल्या तीन लोकांपैकी दोन जण मृत अवस्थेत रुग्णालयात पोहोचले होते. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. बुधवारी दोघांचे शवविच्छेदन (Autopsy) करण्यात येणार आहे.

दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले असून बुधवारपर्यंत सर्वजण उज्जैनला पोहोचतील. नानाखेडा पोलिसांनी (Nanakheda Police) सांगितले की, किरण हरीश हे कार चालवत होते. ते जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत कारमधून कमलेश मिठालाल खत्री (वय 35, रा.धनलक्ष्मी पार्क,नवापूर) आणि नितीन ठक्कर (वय 39, सोनगड, गुजरात) यांचा अपघातात मृत्यू झाला. कार नितीनची असून तिघेही महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जात होते.

Related Stories

No stories found.