प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास लागली आग

प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास लागली आग

नंदुरबार l प्रतिनिधी nandurbar

शहादा (shahada) तालुक्यातील प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन कै.सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास (Fire) आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. शहादा व नंदुरबार येथील अग्निशमन बंबाच्या प्रयत्ना नंतर 2 तासानंतर आग आटोक्यात आली.दरम्यान यात मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे.

(nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील कै. सद्गुरू तोताराम महाराज दोनशे वर्षे पुरातन मंदिरास आज सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान मंदिराच्या वरील बाजूस मंदिराचे पुजारी दिक्षित वास्तव्य करीत असलेल्या भागास अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती, प्रकाशा गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तोताराम महाराज मंदिराच्यावरील भागात आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत सदर मंदिराचे पुजारी हे वरील भागात राहत असल्याने त्यांना मंदिराच्या आपण वास्तव्य करीत असलेल्या वरच्या भागात काहीतरी जळत असल्याचे भास होतात त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना याची माहिती देताच नागरिकसह प्रकाशा सरपंच, उपसरपंच भरत पटेल घटनास्थळी दाखल झाले.काही वेळातच याआगीने मोठे रुद्ररूप धारण केले होत.

मोठ्या प्रमाणात आग पसरून मोठे नुकसान झाले आग ही सकाळी जवळपास एक ते दोन तास धुमसत राहिले आगीची माहिती तात्काळ शहादा येथील अग्निशामक दलाला देण्यात येऊन तेथून अग्निशमन बंब तात्काळ पाचारण करण्यात येऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले तसेच शहादा अग्निशमन येथील बंबा समवेतच नंदुरबार येथून देखील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनबंबला पाचारण करण्यात आले होते सुमारे दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली असून मंदिराचा वरचा भाग व खालचा काही भाग या आगीत जळून खाक झाल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात मंदिरास आग लागण्याची ही पहिलीच घटना घडली आहे याबाबत शहादा महसूल प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी करत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे.तर सदर आगीच्या घटनेत मंदिराचा बराचसा भाग संपुर्णपने जळून खाक झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com