चिंचपाड्यात दोन गटात मारहाण,13 जणांविरोधात गुन्हा

चिंचपाड्यात दोन गटात मारहाण,13 जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा (Chinchpada) येथे जुन्या घराच्या वादातून दोन गटात (Two groups beat) मारहाण झाली. यात दोन्ही गटातील पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून (mutual prosecutor) 13 जणांविरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील सुजाता फुलसिंग वसावे व भुपेंद्र रमेश गावित यांच्यात जुन्या घराचा वाद होता. या वादातून भुपेंद्र रमेश गावित, मनिषा भुपेंद्र गावित, विवेक रमेश गावित, अमित किशोर गावित, हर्षल मनोज वळवी, दीपकचंद्र सुरेश चौर, आकाश नारायाण मेना, दीपक कोकणी (सर्व रा.चिंचपाडा) यांनी सुजाता वसावे वसावे यांच्या घराजा दरवाजा उघडून जिन्यातून छतावर चढून सुजाता वसावे व त्यांचा मुलगा नितलसिंग फुलसिंग वसावे यांना मारहाण करीत तलवारीने जिवेठार मारण्याची धमकी दिली.

तसेच सुजाता वसावे यांच्या वहिणी सुरेखाबाई श्रीराम गावित यांना हाताबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत सुजाता वसावे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम 143, 147, 149, 452, 323, 504, 506 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.

तर दुसर्‍या गटातर्फे मनिषा भूपेंद्र गावित यांनी फिर्याद दिली. जुन्या घराच्या वादातून श्रीराम नारायण गावित, सुरेखाबाई श्रीराम गावित, सुजाताबाई फुलसिंग वसावे, नितलसिंग फुलसिंग वसावे व रमेश मकन धोडीया यांनी मनिषा गावित यांचे पती भुपेंद्र व दीर विवेग गावित यांना काठीने व हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत मनिषा गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम 134, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com