तळोदा येथे ट्रस्टच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री

दगडफेकीत काही जण जखमी
तळोदा येथे ट्रस्टच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री

मोदलपाडा Modalpada / सोमावल | वार्ताहर -

तळोदा येथील एका धार्मिक स्थळाच्या ट्रस्टच्या वादातून (religious site trust dispute) दोन गटात (two groups) प्रशासकीय इमारतीचा बाहेर प्रचंड धुमश्चक्री (clash) झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही काहीजण जखमी (wounded) झाले आहेत. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, जखमींना उपचारासाठी तळोदा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील एका धार्मिक स्थळाचा ट्रस्टचा दोन गटात वाद होता. हा वाद गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होता. त्यामुळे हा वाद पोलिसांपर्यंत पोहचला होता. पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांना समेट घडविण्यासाठी आज शुक्रवारी पाच वाजेला पाचारण केले होते. पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी प्रयत्न करून त्यांच्यातील वाददेखील मिटविण्यात आला होता. त्यामुळे तेथेच दोन्ही गटातील सदस्यांनी गळाभेट केली.

तथापि यातील काहीनी पोलिस ठाण्याबाहेर निघताना एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातच दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यामुळे प्रचंड धुमश्चक्री झाली. या दगडफेकीत काहींच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तळोदा उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी सभाजी सावंत यांनी भेट देवून माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी तळोदा शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com