‘त्या’ लाचखोर अभियंत्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘त्या’ लाचखोर अभियंत्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

ठेकेदाराने (contractor) केलेल्या कामांच्या ८ कोटी ४५ लाखांच्या देयकापोटी (payment) ४३ लाख ७५ हजाराची लाच (Bribe) मागणार्‍या व त्यापैकी चार लाखाची टोकन रक्कम स्विकारणार्‍य अक्कलकुवा (Akkalkuwa) येथील जि.प.च्या उपअभियंता (ZP Deputy Engineer) सुनील दिगंबर पिंगळे (Sunil Digambar Pingale,), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे व खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या घराचीही झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) घेतल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभागामार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची (Veterinary clinic) नवीन ईमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे व ईतर ४५ कामांचे कार्यारंभ आदेश ठेकेदाराला (contractor) मिळाले होते.

ती सर्व कामे ठेकेदाराने पूर्ण केली. सदर कामांबाबत अक्कलकुवा येथील जि.प.उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे (वय ४८ वर्ष), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे, (वय ५२ वर्ष) यांनी एकूण ८ कोटी ४५ लाख ८९ हजार रुपये अंतिम देयके (payment) मान्य केले.

यापैकी एकुण ७ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपये एवढी रक्कम ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र, उर्वरीत ८४ लाख रुपये एवढी रक्कम संबंधीत अधिकार्‍यांनी राखून ठेवली. सदर ८४ लाख रुपये देण्यासाठी उप अभियंता सुनील पिंगळे यांनी ३० लाख ५० हजार रुपये व शाखा अभियंता एस.बी.हिरे यांनी १३ लाख २५ हजार रुपये अशी एकुण ४३ लाख ७५ हजार रुपये एवढ्या रकमेची मागणी (Demand for money) ठेकेदाराकडे केली. सदर रक्कमेची हमी म्हणून जळगाव जनता सहकारी बँक शाखा नंदुरबार या बँकेचे ३० लाख ५० हजार रुपयांचा धनादेश व १३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश (Check) असे दोन धनादेश दिनेश यादवराव सोनवणे या इसमाच्या नावाने लाचेपोटी लिहून घेऊन त्यांच्या ताब्यात ठेवले.

रोख रक्कम आणून दिल्यानंतर सदरचे दोन्ही धनादेश परत करून देऊ असे सांगितले होते. जि.प.बांधकाम उप अभियंता वर्ग-१ सुनील दिगंबर पिंगळे, जि.प. बांधकाम सहाय्यक अभियंता वर्ग-२ एस.बी.हिरे (दोन्ही नेमणुक जि.प. बांधकाम उपविभाग कार्यालय अक्कलकुवा) यांनी तक्रारदारांकडून ४३ लाख ७५ हजार लाचेची मागणी (Demand for bribe) करून तडजोडीअंती प्रथम हप्ता टोकन रक्कम ४ लाख रुपये दि.२३ मार्च २०२२ रोजी पंच साक्षीदारांसमोर स्विकारली.

याप्रकरणी सुनील दिगंबर पिंगळे, संजय बाबुराव हिरे, खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा (वय ३२) यांना काल ताब्यात घेण्यात आले येवून त्यांच्यविरुद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघा लाचखोर अभियंत्यांच्या घरी काल व आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यांच्या मालमत्तेची चौकशी केल्याचे समजते. मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होवू शकली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com