नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयात काल दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (Corona positive) आढळला होता.त्यानंतर आज पुन्हा दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आज नंदुरबार प्रशासनातर्फे 94 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.यात जिल्ह्यातील दोन जण कोरोना बाधित आढळले आहेत.यात नंदूरबार शहरातील अबिका रोड येथील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

कालच नंदूरबार शहरातील अरिहंत नगर येथील एका महिला व तळोदा येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नंदूरबार जिल्हयात आतापर्यंत 37 हजार 571 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

त्यापैकी 951 जणांचा मृत्यू झाला आहे तर 36 हजार 616 जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.