तळोदा येथील काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांचा आज मुुंबईत भाजप प्रवेश सोहळा

तळोद्यातील काहींची अटीशर्थींच्या शब्दासाठी ‘फिल्डींग’
तळोदा येथील काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांचा आज मुुंबईत भाजप प्रवेश सोहळा

मोदलपाडा Modalpada/सोमावल । वार्ताहर -

तळोदा (Taloda) येथील काँग्रेसचे नगरसेवक (Congress corporator) गौरव वाणी व सुभाष चौधरी हे उद्या दि.5 नोव्हेंबर रोजी मुंबई (Mumbai) येथे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका (Big blow to Congress) मानला जात आहे. हे दोन्ही नगरसेवक माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी (Former Minister Adv. Padmakar Valvi) व माजी नगराध्यक्ष भरत माळी (Former Mayor Bharat Mali) यांचे निकटवर्तीय आहेत.

तळोदा येथील काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांचा आज मुुंबईत भाजप प्रवेश सोहळा
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीसाठी विलंबशुल्कासह १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज

यांच्या भाजपामध्ये जाण्याने काँग्रेस पक्षाचे नुकसान तर होणार आहे. परंतु या व्यतिरिक्त तालुक्यातील काँग्रेस पक्षातील अजून कोणते पदाधिकारी पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करतील याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.

तळोदा येथील नगरपालिकेच्या निवडणूकीत गौरव वाणी हे सलग दुसर्‍यांदा काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तर सुभाष चौधरी यांच्या पत्नी याआधी काँग्रेसच्या नगराध्यक्षा होत्या. त्यावेळी सुभाष चौधरी यांना काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक पद दिले होते. आता श्री.चौधरी हे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत. बर्‍याच महिन्यांपासून काँग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसचे दुसरे नगरसेवक सुभाष चौधरी हेही भाजपाच्या वाटेवर आहेत. याबाबत शक्यता वर्तवण्यात येत नव्हती.

मात्र, आता सुभाष चौधरी सुद्धा गौरव वाणी यांच्यासोबत प्रवेश करीत असल्याने काँग्रेस गटाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा शक्ती प्रदर्शन करत होणार असल्याने तालुक्यातील मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथील कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

तळोदा येथील काँग्रेसच्या दोघा नगरसेवकांचा आज मुुंबईत भाजप प्रवेश सोहळा
Photos # संतनगरीत उसळली भक्तांची गर्दी

यात प्रामुख्याने भाजपाचे आ.राजेश पाडवी, लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नगरसेवकांचा प्रवेश हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अनेक जण भाजपाच्या वाटेवर

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नुकसान होऊन फक्त 13 ग्रामपंचायतींवर काँग्रेसला वर्चस्व राखता आले. परंतु काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या अभावामुळे सधस्थितीत अजून काही ग्रामपंचायती व त्यातील निवडून आलेले काँग्रेसचे पदाधिकारी हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. असे झाले तर तालुक्यात काँग्रेस खिळखिळी होईल हे निश्चित आहे.

गळती रोखण्याचे काँग्रेस श्रेष्ठींसाठी आव्हान

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळी सुद्धा काँग्रेसमधील दुफळी व समन्वयाचा अभाव जिल्हावासीयांनी अनुभवला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक यांनी थेट उपाध्यक्ष पदावर मुसंडी मारुन काँग्रेसला झटका दिला. या अनुषंगाने जिल्ह्यातील काँग्रेसची गळती काँग्रेसच्या नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. यापुढेही गळती रोखण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर आहे.

तळोद्यातील काहींची अटीशर्थींच्या शब्दासाठी ‘फिल्डींग’

भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी तळोद्यातून काँग्रेसचे खंदे समर्थक व नगरसेवक पंधरा गाड्यांचा ताफा घेवून ठाणे येथे रवाना झाला आहे. दरम्यान, काही अटी शर्तीच्या शब्द भाजप नेतृत्वाने देण्यासाठीही फिल्डिंग लावली जात आहे.

तालुक्यातील काँग्रेसचे बरेच नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत.काही अटी शर्तीच्या शब्द भाजप नेतृत्वाने द्यावा यासाठी फिल्डिंग सुरू आहे. अशातच काँग्रेसचे नगरसेवक, पालिकेचे प्रतोद गौरव वाणी व माजी नगराध्यक्षा रत्नाताई चौधरी यांचे पती, विद्यमान नगरसेवक सुभाष धोंडू चौधरी यांचा प्रवेश निश्चित असल्याने ते मार्गस्थ झाले आहेत. उद्या दि.5 नोव्हेंबर रोजी प्रवेश केला जाणार आहे. सोबतच माजी नगराध्यक्षा सौ.ताराबाई बागुल, नगरसेवक सतिवान पाडवी, राष्ट्रवादीचे भरत चौधरी यांच्या नावांचीही चर्चा आहे.

गौरव वाणी व सुभाष चौधरी हे माजी नगराध्यक्ष भरत माळी गटात असून माजी आमदार अ‍ॅड.पद्माकर वळवी यांचे कट्टर समर्थक असतांना भाजपात प्रवेश करत असल्याचे तालुक्यातील राजकारणात चर्चेचा आणि काँग्रेससाठी धक्कादायक निर्णय असल्याचे मानले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com