३५ बिअरचे बॉक्स चोरुन नेल्याप्रकरणी दोघांना अटक, दोन २ आरोपी फरार

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
३५ बिअरचे बॉक्स चोरुन नेल्याप्रकरणी दोघांना अटक, दोन २ आरोपी फरार

नंदुरबारNandhurbar | प्रतिनिधी

धडगांव Dhadgaon तालुक्यातील कात्री गावातील हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून ८४ हजार ९६९ रुपये किंमतीचे ३५ बिअरचे बॉक्स Box of beer चोरुन नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण local crime branch शाखेने दोघांना अटक केली असुन,मुद्देमालासह ३ लाख रुपये किमंतीची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे. उर्वरीत २ आरोपी फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० ते दि. ११ ऑगस्ट दरम्यान धडगांव तालुक्यातील कात्री गावातील हॉटेल हितेश परमिट रुमच्या शटरचे कुलूप तोडून ८४ हजार ९६९ रुपये किंमतीचे ३५ बिअरचे बॉक्स चोरुन नेल्याने हॉटेल मॅनेजर सामसिंग सेमटया बळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगांव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .

दि.१२ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मोलगी येथील एका इसमाकडे बियरचे काही बॉक्स आहेत अशी बातमी मिळाल्यावरून रतिलाल राड्या पाडवी रा . मोलगी ता अक्कलकुवा यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने इतर ३ इसमांसह चोरी केल्याची कबुली दिली त्यावरुन रतिलाल राड्या पाडवी रा . मोलगी ता अक्कलकुवा, गणेश अमरसिंग वसावे रा . पाटीलपाडा, मोलगी यांना अटक करुन त्यांचकडून १२ हजार ७५० रुपये किमतीचे कांगारू प्रिमीयम बियरचे ५०० एम एल , टीनचे ६ बॉक्स व गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमंतीची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे .

उर्वरीत २ आरोपीतांचा शोध घेवून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम चालू असुन दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धडगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षकमहेंद्र पंडित , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप - अधीक्षक ( गृह ) देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , विकास कापुरे , किरण मोरे , अभिमन्यु गावीत यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक ,महेंद्र पंडित यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com