
नवापूर | श.प्र.- NAVAPUR
पिंपळनेर-नवापूर (Pimpalner-Navapur) रस्त्यावर साखरेच्या (Sugar) पोत्यांनी भरलेला ट्रक चरणमाळ घाटातील वळणावर ब्रेक फेल (brake failure) झाल्याने पलटी झाला. या अपघातात साखरेचे (Sugar) नुकसान झाले असून चालक व सहचालक जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सटाना येथील द्वारकाधीश साखर कारखाना (Sugar factory) येथून ट्रक (क्र.जीजे ३२ टी ९३९८) साखरचे पोते भरुन गांधीधाम गुजरात येथे जात होता. पिंपळनेर-नवापूर रस्त्यादरम्यान असलेल्या चरणमाळ घाटात उतारावर ट्रकचा अचानक ब्रेक फेल (brake failure) झाल्याने नजीर जमालभाई इसाकाणी, युसुम मोहम्मद कबीराणी (रा.सोमनाथ, ता.बेरावल जि.गिरसोमनाथ, गुजरात) यांनी गाडीतून उडी मारली. त्यात ते किरकोळ दुखापती झाले.
त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.(जीजे३२-टी ९३९८) चक्काचूर झाली. यात गाडीचे व गाडीतील मालाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलीसांत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रतापसिंग वसावे करीत आहेत.