नंदुरबार - वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात

नंदुरबार - वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

वाका चार रस्त्यावर (Nandurbar-Waka Char road) तीन ट्रकांमध्ये झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून या अपघातात (accident) तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सदर अपघात घडला. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार - वाका चार रस्त्यावर (दि.4) शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास सुकलाल झानसिंग बेडाले (रा.खरगोन, मध्यप्रदेश) हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून जात असतांना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले.

यामुळे पेट्रोल पंपापासून काही अंतरावर निझरकडून नंदुरबारकडे येणारा ट्रक (क्र.एम.एच.18 बीजी 8508) यास धडक दिली. तोच आणखी एक ट्रक दोन्ही वाहनांजवळ धडकल्याने तिहेरी अपघात घडला. यात तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये नामदेव प्रल्हाद ठाकरे (वय 38, रा. चितोड रोड, धुळे), सुकलाल झानसिंग बेडाले (रा.खरगोन, मध्यप्रदेश) व सितारामसिंग भटतारा (रा.खरगोन, मध्यप्रदेश) असे तिघा वाहनांवरील चालक जखमी झाले आहेत.

सदर अपघात घडल्यानंतर रात्रीच्यावेळेला या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनधारकांना एक ते दीड तास ताटकळत रहावे लागले. उपनगर पोलिस निरीक्षक श्री.भदाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

याप्रकरणी नामदेव प्रल्हाद ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक सुकलाल बेडाले याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 279,337, 427 सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com