पारंपरिक पेहरावात होणार आदिवासी महासंमेलन : आदिवासी एकता परिषदेचा निर्णय

पारंपरिक पेहरावात होणार आदिवासी महासंमेलन  : आदिवासी एकता परिषदेचा निर्णय

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

अवघ्या देशातील आदिवासी संस्कृतीचे (tribal culture) संवर्धन करणे, जीवनमूल्यांची ओळख करून देणे व खर्‍या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी राजस्थान (Rajasthan) (प्रतापगड) येथे होणार्‍या एकता परिषदेच्या (Ekta Parishad) 29 व्या सांस्कृतिक महासंमेलनात (Cultural Convention) समाजबांधवांनी आदिवासींच्या पारंपरिक पेहराव (Traditional attire) परिधान करणे बंधनकारक आहे, असा निर्णय नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय सभेत (state level meeting) घेण्यात आला.

महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची संयुक्त सभा नंदुरबारात घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी रॉबिन नाईक होते, तर ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, एकता परिषदेचे संस्थापक सदस्य दरबारसिंग पाडवी, राज्य महासचिव डोंगरभाऊ बागुल, जि. प. सदस्य सी. के. पाडवी, सीताराम राऊत, करमसिंग पाडवी,अ‍ॅड. अभिजित वसावे, भीमसिंग वळवी, सुनील गायकवाड, प्रेमचंद सोनवणे, ऍड. शितल गायकवाड, अ‍ॅड. जयकुमार पवार, अ‍ॅड. विजय नाईक, सुभाष नाईक, चंद्रसिंग बर्डे, अ‍ॅड. आपसिंग वळवी, जयसिंग वळवी, सरपंच सत्तरसिंग शेमले, सतीलाल शेमले, जमन ठाकरे, दीपक अहिरे, प्रमोद ठाकरे, दीपक ठाकरे, भगवान वाळवी, कृष्णा गावित, जया सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या सभेत महासंमेलनासाठी महाराष्ट्रातुन वक्ते, युवा व महिला सत्राच्या अध्यक्ष पदासाठी नावे घेण्यात आली. रॅली व आर्थिक नियोजन यावर चर्चा करण्यात आली. यासह आदिवासींच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. शिवाय महासंमेलनात प्रत्येक वक्त्यांनी नेमक्या मुद्यावर मत मांडावे, भरकटल्यास मर्यादा आणल्या जातील असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रेमचंद सोनवणे यांनी आदिवासी संस्कृती व जीवन पद्धतीत अवघे विश्व वाचविण्याची ताकद असल्याचे म्हणत हि संस्कृती वाचविण्याचे आवाहन केले. सुनील गायकवाड यांनी प्रस्थापित संस्कृतीचा अवलंब होत असल्याची खंत व्यक्त केली. जया सोनवणे यांनी आदिवासी महिलांच्या समस्या मांडल्या.

Related Stories

No stories found.