नवापूर येथील आदिवासी कारखान्यात सत्तांतर

भाजपा पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय, नाईक परिवाराची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात
नवापूर येथील आदिवासी कारखान्यात सत्तांतर

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची (Sugar factory) गेल्या २५ वर्षापासून कॉंग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. पाच पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध झाल्या. यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्यात भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे तब्बल २५ वर्षानंतर आदिवासी सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्तांतर झाले आहे. या निवडणुकीत दोन गावित परिवाराने एकत्र येऊन कॉंग्रेस (Congress) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्याविरोधात निवडणूक लढवली. यात दोन्ही गावित परिवाराची सरशी झाली आहे.

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचीपंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपल्याने १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली.

निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुरूवात झाली. २ फेरीत १२ टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. यात सुरुवातीला सकाळी नवागाव, नवापूर गटातील १२ मतदान केंद्रातील पेटीतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली.

आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलमध्ये १४ उमेदवार असे दोन्ही गटातील एकूण २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

पहिल्या फेरीमध्ये शेतकरी विकास पॅनलला परिवर्तन पॅनलने धक्का दिला. तब्बल ११ उमेदवार आघाडीवर होते तर शेतकरी विकास पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर होते. दोन फेरीमध्ये हा निकाल लावण्यात आले आहे. यामध्ये नवागाव, नवापूर, विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार या पाच गटांचा समावेश होता.

कारखान्याच्या संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे आरिफ बलेसरिया व अजित नाईक हे दोन उमेदवार आधीच बिनविरोध झाले होते. १५ जागांसाठी पाच गटात शनिवारी मतदान झाले.

कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५ तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. एकूण ९ हजार ७१७ पैकी ५ हजार १३५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित,

खा.डॉ.हिना गावित, माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करितजल्लोष केला.

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

नवागांव गट-हरिदास जेसा गावीत (२५९६),

नवापूर गट-आलु होण्या गावीत (२४७१),

देवराम वसंत गावीत (२४२२)

भरत माणिकराव गावीत (२४०९)

विसरवाडी गट- बकाराम फत्तेसिंग गावीत (२५६८)

रमेश जाण्या गावीत (२४९१)

खांडबारा गट- लक्ष्मण धेडू कोकणी (२५०१)

रावजी कातक्या वळवी (२४४१)

नंदुरबार गट- जगन चंद्रा कोकणी(२५६१),

रुद्राबाई धरमसिंग वसावे (२४७३)

महिला गट- मीराबाई पारत्या गावीत (२५०२)

संगीता भरत गावीत (२४९०)

अनुसूचित जाती जमाती गट- सीताराम शंकर ठाकरे (२६०२)

भटक्या विमुक्त जाती - रमेशचंद्र धनसुखलाल राणा (२६४४)

शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार

नवागांव गट- विनोद बाळू नाईक (२३४४)

संस्था गट- अजित सुरुपसिंग नाईक (बिनविरोध)

इतर मागास वर्ग- आरीफभाई बलेसरिया (बिनविरोध)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com