चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत

चार जणांना अटक ,नवापूर पोलीसांची कारवाई
चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत

नवापूर Nawapur । श.प्र

नवापूर पोलीस ठाणे ()Police Station हद्दीतुन चोरीस (Stolen) गेलेल्या सुमारे 1 लाख 30 हजाराच्या 3 मोटार सायकली (motor cycles) 4 संशयीतांकडुन ()4 from the skeptics नवापूर पोलीसांनी हस्तगत (Captured) केल्या आहेत.याप्रकरणी चार जणांना अटक (Four people were arrested) करण्यात आली आहे.

चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

याबाबत अधिक माहिती अशी की, 8 ऑक्टोंबर रोजी रात्री नवापुर तालुक्यातील लक्कडकोटयेथील केवलसिंग अर्जुनसिंग सोलंकी यांची 50 हजाराची (क्र.जी. जे. 26 ओ. डी. 0107 ) दुचाकी, 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नवापुर शहरातील देवळफळी भागातुन चिराग प्रकाश गावीत यांची 50 हजाराची दुचाकी (क्र.जी. जे. 26 एम. 4434) तसेच 4 ऑक्टोंबर रोजी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन भागातील गरबा मंडळाचे जवळ श्याम पंडीत गोसावी यांच्या मालकीची 30 हजाराची दुचाकी ( क्र. जी. जे.19,एफ.5466) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने नवापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण
चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
नाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील आदेशाने नवापुर पोलीस ठाण्याचे पालीस निरीक्षक निलेश वाघ यांनी पथक तयार करुन त्यांना सुचना देवुन रवाना केले. त्यानंतर निलेश वाघयांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयीत आरोपी शाहरुख ऊर्फ चेंडु मुख्तार काकर रा.मगधुमनगर, ता. जि. व्यारा, गुजरात याने लक्कडकोट येथील केवलसिंग अर्जुनसिंग सोलंकी यांचीमोटार सायकल चोरी केली असुन.तो पुन्हा दुसर्‍या मोटार सायकली चोरी करण्याचे बेतात असुन लक्कडकोट परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्या बाबत माहिती मिळाल्याने. निलेश वाघ यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक मनोजपाटील, अ.स.ई. गुमानसिंग पाडवी, हवालदार नरेंद्र नाईक, पोलीस नाईक प्रविण मोरे, पोलीस शिपाई प्रशांतखैरनार, रणजित महाले, श्याम पेंढारे यांच्या पथकाला पाठवले.

चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

पथकाने सापळा रचुन संशयीत आरोपी शाहरुख ऊर्फ चेंडु मुख्तार काकर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता नमुद आरोपी याने सदरची मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल करुन ती त्याचे ओळखीचा शोएब अमिन शाह रा.ईस्लामपुरा, ता.नवापुर यांस विक्री केली असल्याचे कबुल केले. त्याअनुषांगने पोलीस अधिकारी व अंमलदारयांनी 50 हजाराची दुचाकी शोएब अमिन शाह यांच्या कडुन हस्तगत करीत त्याला अटक केली.

त्यानंतर पो. निलेश वाघ यांना बातमी मिळाली की, संशयीत आरोपी जमिल ऊर्फ सपान खलील शेख रा.ईस्लापुरा, नवापुर याने चिराग प्रकाश गावीत, श्याम पंडीत गोसावी यांची मोटार सायकली चोरी करुन त्याचा मित्र मोहंमदआकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख रा.राम रहिम चौकी, चिरागअली मोहल्ला, नंदुरबार, यास विक्री केली असुन तो पुन्हा दुसर्‍या मोटार सायकली चोरी करण्याचे बेतात असुन नवापुर शहरातील लाईट बाजारपरिसरात संशयास्पदरित्या फिरत असले बाबत माहिती मिळाल्याने निलेश वाघ यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षकअशोक मोकळ, अ.स.ई.विकास पाटील, अ.स.ई. युवराज परदेशी, हवालादर दादाभाई वाघ, नितीन नाईक,दिनेशकुमार वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, पोलीस शिपाई सुनिल बर्वे, पंकज सुर्यवशी, विक्की वाघ यांचे पथक पाठवले.

चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!

पथकाने सापळा रचुन संशयीत आरोपी जमिल ऊर्फ सपान खलील शेख यासताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदरच्या मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल करुन ती त्याच्या ओळखीचा मोहंमद आकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख यास विक्री केली असल्याचे कबुल केले. त्याअनुषांगने पोलीसअधिकारी व अंमलदार यांनी लागलीच सुमारे 50 हजाराची व 30 हजाराची या दोन दुचाकी मोहंमद आकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख याच्या कडुन जप्त करीत त्याला अटक केली.

चोरीला गेलेल्या तीन दुचाकी हस्तगत
गोलाणी संकुलातील बंद पडलेल्या लिफ्टमधील कचर्‍याला आग

एकुण 4 आरोपी यांच्या कडुन सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 3 मोटार सायकली जप्त करण्यातआल्या आहेत.सदरची कारवाई अधीक्षक पी. आर. पाटील, विभागाचे उपविभागिय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचेे प्रभारीअधिकारी निलेश वाघ, मनोज पाटील, अशोक मोकळ, अ.स.ई.गुमानसिंग पाडवी, अ.स.ई. विकासपाटील, अ.स.ई. युवराज परदेशी, हवालदार नरेंद्र नाईक, हवालादर दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, दिनेशकुमार सु.वसुले, पोलीस नाईकयोगेश थोरात, प्रविण मोरे, पोलीस शिपाई प्रशात खैरनार, रणजित महाले, श्याम पेंढारे, सुनिलबर्वे, पंकज सुर्यवशी, विक्की वाघ यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com