मजुरांच्या पिकअप वाहनाला अपघात : तीन ठार, नऊ जखमी

मजुरांच्या पिकअप वाहनाला अपघात : तीन ठार, नऊ जखमी

नंदुरबार । Nandurbar

धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे मजुरांना घेऊन जाणार्‍या पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने 3 जण जागीच ठार तर 12 जण जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिका च्या मदतीने धडगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे, नऊ जखमींपैकी एका जणाला डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मयत झालेल्यांमध्ये एक महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

पीक अप वाहनातील सर्व प्रवाशी मजूर गोरंबा येथील रहिवासी असून आपल्या गावाहून मिरची तोड मजुरीसाठी नंदुरबार तालुक्यातील लोय पिपळोद येथे येत असताना घाट रस्त्यात पिकप वाहन तीव्र उतारावरून मागे येत दरीत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात 3 जण ठार तर 12 जण जखमी झाले. मयतांमध्ये वन्ती फत्या पटले (37), विक्रम फत्या पटले (9), सांगलया सिपा वसावे (10) यांचा समावेश आहे.

घटनास्थळी धडगाव पोलीस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी मजुरांना 108 रुग्णवाहिका व खाजगी वाहनांच्या मदतीने धडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com