
नंदुरबार |Nandurbar | प्रतिनिधी
नंदुरबार (nandurbar) शहरातील मोठ्या मारूती मंदिराजवळ बस व मोटारसायकलचा (bus and motorcycle) भिषण अपघात झाला असुन अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असुन पुरूष व बालीका जखमी असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार (nandurbar) शहरातील मोठ्या मारूती मंदिराजवळ अमळनेर डेपोची बस अमळनेरहुन नंदुरबारकडे येत असतांना दि.२४ मे रोजी १०.१५ वाजेच्या सुमारास अपघात झाला.
अक्कलकुवा येथील दांपत्य नंदुरबार (nandurbar) येथील गवळी वाड्यात लग्नासाठी आले असतांना गावात बाजार करून लग्न घरी देव घेण्याचा कार्यक्रम असल्याने ते घराकडे निघाले असतांना मोठ्या मारूती मंदिराच्या बाजुला उतारावर अमळनेर नंदुरबर बस (एम.एच.२०,बी.एल.१४१७) ची व मोटारसायकलची (एम.एच.३९,पी.२५२१) धडक होताच महिला व पुरूषासह बालीका रस्त्यावर फेकल्या गेल्या.
या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असुन पुरूष व बालीका जखमी असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रूग्णावाहिकेव्दारे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताच्या ठिकाणी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. अपघात स्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी रहदारी सुरळीत केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.