
मोलगी | वार्ताहर - nandurbar
साकलीउमर ता. अक्कलकुवा (Akkalkuva) येथे गेल्या तीन दिवसात तीन (goat) शेळ्यांचा अतीसाराने (Diarrhea) मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधीच पुरामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवांना मोठा फटका बसला आहे.
सातपुडयात गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे सातपुड्यात नद्या नाल्यांना पुरांमुळे अनेक रस्ते वाहून गेल्याने सातपुड्यातील जनता बैचेन झाली आहे. अशातच या पुराचा फटका मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. या जनावरांना वेगवेगळ्या साथीच्या आजाराने ग्रासले आहे.
जनावराना वेळेवर (Veterinary services) पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने प्राण द्यावा लागत आहे. अशातच साकलीउमर आट्याबारीपाडा येथील आमश्या ढुंडा वसावे यांचे 3 दिवसांत एका मागून एक अशा तीन शेळ्यांना अतिसार झाल्याने मृत्युमुखी पडल्या. पशुसंवर्धन विभागाच्या पशुसेवा या परिसरातील लोकांच्या जनावरांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दवाखान्यात सोय सुविधांचा अभावी असल्याने माझ्या शेळ्याना जीव गमवावा लागला असल्याचा आरोप आमशा वसावे यांनी केला आहे.