वाहनाच्या धडकेत गाईसह तीन बकर्‍यांचा मृत्यू ; मुलगा जखमी

वाहनाच्या धडकेत गाईसह तीन बकर्‍यांचा मृत्यू ; मुलगा जखमी

नंदुरबार। nandurbar प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील मंंदाणे ते शहदा रस्त्यावरील कोळपांढरी गावाजवळ वाहनाने (vehicle;) धडक दिल्याने गाईसह (cow) तीन बकर्‍यांचा (goats) मृत्यू (died)झाला. तसेच 15 वर्षीय मुलगा (Boy injured) व बकरी, वासरु जखमी झाले. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा ते मंदाणे रस्त्याने निरज प्राणसिंग विश्वकर्मा (रा.मसुदपूर ता.गंजबासोद जि.बिदिसा, म.प्र.) याने त्याच्या ताब्यातील चारचाकी घेवून जात असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालविल्याने कोळपांढरी गावाजवळ धडक दिल्याने एक गाय व तीन बकर्‍यांचा मृत्यू झाला

. तसेच दिलवर सुदाम पावरा (वय 15) हा मुलगा जखमी झाला असून एक बकरी व दोन धांडे, वासरु असे जखमी झाले. याबाबत पोना.जितेंद्र ईशी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात वाहन चालक निरज विश्वकर्मा याच्याविरोधात भादंवि कलम 279, 337, 338, 427, 428, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अशोक कोळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com