आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांची मोठ्ठी कारवाई, जिल्ह्यातील 15 गुन्हे उघड
आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
USER

नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी

दुकानांचे शटर उचकावून चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला (inter-state gang) स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) मध्य प्रदेश राज्यात जावून अटक (arrested) केली असून तीन आरोपीतांसह (Accused) 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन जिल्ह्यातील 15 गुन्हे उघड केले आहे.

जिल्ह्यातील शहादा, सारगंखेडा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात असलेल्या दुकानांचे शटर (shutters of the shops) उचकावून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये (Crimes of theft) वाढ झाल्याने नागरिक दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दि .3 मे रोजी सकाळी 5.30 वाजे दरम्यान मंदाणा ता- शहादा येथील अंगणातुन मोटार सायकल तसेच साक्षीदार यांचे कापड दुकानातील व मेडीकलमधील कपडे रोख रुपये ,शिवाजी नगर मंदाणा येथील घरातील रोख रुपये सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल कोणीतरी 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसमांनी दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश करुन घरफोडी केली म्हणून अमोल शालीग्राम साळुंखे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता.

दि.3 मे रोजी शहादा तालुक्यातील मंदाणा गावात एकाच रात्रीतून दोन दुकानांचे शटर (shutters of the shops) उचकावून चोरी , एक मोटर सायकल चोरी, एका घराचा कुलुप तोडुन चोरी करणे अशी घटना घडली .दि. 17 मे रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , शहादा, म्हसावद व सारंगखेडा परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी ही नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बडवानी जिल्ह्यातील कालाखेत व धार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील आहे .

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे श्री.पाटील यांनी आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथे गेले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील पाटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोकराटा, आमली, कालाखेत, गोलपाटीबैडी इत्यादी गावांच्या पाड्या पाड्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने जावून येथे 3 ते 4 दिवस मुक्काम करुन मिळालेल्या बातमीमधील संशयीत इसमांच्या घराच्या परीसरात वेषांतर करुन माहिती प्राप्त केली असता मिळालेली माहिती खात्रीशिर असलेबाबत समजले.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एकाच वेळी तिन्ही संशयीत आरोपीतांच्या घरी धाड टाकुन तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेण्याबाबत नियोजन केले.त्याप्रमाणे दि. 19 मे रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या अंधारात डोंगर दर्‍यांमधून सतत 16 कि.मी. पायपीट करुन एकाच वेळी न्हावड्या फळी, बोकराटा येथील संशयीतांच्या घरी अचानक छापा टाकुन तुकाराम मास्तरीया वास्कले (ववेलका), संना रामसिंग वास्कले (वालका), समदर रामसिंग वास्कले सर्व रा. मु. न्हावड्या फळी, कालाखेत पोस्ट बोकराटा ता.पाटी (जि.बडवानी म.प्र.) यांना ताब्यात घेतले.

तिन्ही संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन विचारपुस केली असता, तुकाराम वास्कले याचे वडील बडवानी जिल्हा कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना संना व समदार यांची ओळख मध्यप्रदेश राज्यातीलच धार जिल्ह्यातील नवलसिंग धरमसिंग नोरद्या, रायसिंग यांच्याशी झाली.

कालांतराने तुकाराम वास्कले याचे वडील शिक्षा पूर्ण भोगून घरी आल्यानंतर नवलसिंग,धरमसिंग,नोरद्या, रायसिंग हे समदर वास्कले यांच्या मदतीने मागील 9 ते 10 महिन्यात त्यांनी शहादा, म्हसावद, सारंगखेडा हद्दीतील छोट्या छोट्या गावांमध्ये शटर उचकावून चोरी व मोटर सायकल चोरीचे केल्याची कबुली दिली.शहादा, म्हसावद, सारंगखेडा पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखावरील 9 घरफोडी व 6 मोटर सायकल चोरी असे एकुण 15 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही संशयीत आरोपीतांना चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता दि.3 मे रोजीच्या मंदाणा येथील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 35 हजार रूपये कि. एक मोटर सायकल, 30 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटर सायकल, वडाळी, सारंगखेडा येथील मोबाईल दुकानाच्या चोरीतील 27 हजार 477 हजार रुपये किमंतीचे 6 मोबाईल, 57 हजार रूपये किंमतीच्या 5 साड्या, 2 हजार 600 रूपये रोख असा एकुण 1 लाख 777 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी नवलसिंग भिल, धरमसिंग भिल, नोरद्या, रायसिंग सर्व रा. कुक्षी (जि.धार मध्यप्रदेश) यांच्याकडे असल्याचे सांगितले .

लवकरच वरील चारही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले .सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर . पाटील, पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे, पोलीस कॉन्सटेबल विजय ढिवरे, दिपक न्हावी, अभिमन्यु गावीत,शोएब शेख, रमेश साळुंखे तसेच पाटी पोलीस ठाण्याचे केशव यादव, पोलीस हवालदार बलविरसिंग मंडलोई यांच्या पथकाने केली आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com