मोटरसायकल व मोबाईल लंपास करणार्‍या तिघांना अटक

56 हजाराचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
मोटरसायकल व मोबाईल लंपास करणार्‍या तिघांना अटक

नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील विसरवाडी (Visarwadi) येथून मोटारसायकल व मोबाईल (motorcycle and mobile phone) लंपास करणार्‍या तीन संशयित आरोपीतांना (Suspected accused) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) सुरत येथे अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्ययात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.31 मार्च रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गोविंद रामचंद्र कोकणी (Govind Ramchandra Kokani) (रा.पळसून ता.नवापूर) हे विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ (Reliance Petrol Pump) रस्त्यालगत लघुशंकेसाठी गेले असता त्यांच्या मालकीची काळया रंगाची शाईन मोटार सायकल (motorcycle) (क्र . एम.एच. 39, ए.ए.7933) व व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 36 हजाराचा मुद्देमाल अज्ञात तीन चोरट्यांनी (three thieves) चोरून नेला. म्हणून विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून (Local Crime Branch) समांतर तपास (Parallel investigation) सुरु असतांना दि.6 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे 6 ते 7 दिवसापूर्वी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल व मोबाईल चोरणारे उधना, सुरत येथील आहेत. त्यानुसार श्री.कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन उधना सुरत येथे रवाना केले.

उधना सुरत येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे संशयीत आरोपीतांचे (Suspected accused) फक्त वर्णन होते. पथकाने 2 ते 3 दिवस सुरत उधना येथे अहोरात्र मेहनत घेवून संशयीत आरोपी रहात असलेल्या परिसरात वेशांतर करुन सापळा रचला (Set the trap). दि. 8 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सदर गुन्हयातील एका संशयीत पंकज मच्छिद्र सैंदाणे रा .आंबारे ता अमळनेर जि.जळगाव ह.मु.गांधी कुटी, कम्युनिटी हॉल घर नं.51 , उधना, सुरत यास अटक (Arrested) करीत विसरवाडी (Visarwadi) येथील मोटारसायकल व मोबाईल चोरीबाबत विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. म्हणून त्यास पोलीसी खाक्या दाखविला असता, त्याने सदरचा गुन्हा (crime) उधना येथीलच त्याचे इतर दोन साथीदार रियाज व दिपक यांच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली.

त्यास मोटारसायकलीबाबत विचारले असता, त्याने विसरवाडी (Visarwadi) येथून चोरी करुन आणलेली मोटारसायकल घराच्या मागील बाजुस लपवुन ठेवलेली आहे व मोबाईल बंद करुन कपाटात ठेवलेला आहे, असे सांगितले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल व मोबाईल हस्तगत केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात असलेला संशयीत आरोपी पंकज याच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेले पठाण रियाज रज्जाक खान (रा.संजय नगर, गोगा प्लॅट न . 201 उधना सुरत), दिपक अनिलभाई जयस्वाल उर्फ दिपक अनिलभाई हरिजन (रा.घर नं.804 नुरानो वसाहत , रामदेव नगर , उधना, सुरत यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्यांनीदेखील गुन्हा केल्याचे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेले तीन संशयित आरोपी व गुन्हयातील चोरीस गेलेली 31 हजार रुपये किमतीची मोटारसायकल व 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच 20 हजार रुपये किमतीची गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कुटी असा एकुण 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) करून आरोपी व मुद्देमाल गुन्हयाच्या पुढील तपास कामी विसरवाडी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेका प्रमोद सोनवणे, पोना दादाभाई मासुळ, पोना जितेंद्र ठाकुर, पोना मोहन ढमढेरे, चापोना रमेश सांळुखे, पोशि राजेंद्र चिंतामण काटके, पोशि शोएब जब्बार शेख यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com