रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना अटक

१७ हजाराच्या रोकडसह मुद्देमाल हस्तगत, लोहमार्ग पोलीसांची कामगिरी
रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणार्‍या तिघांना अटक

नंदुरबार | | प्रतिनिधी NANDURBAR

सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये (train) प्रवाशांना मारहाण (robbing passengers) करुन त्यांच्याकडून १७ हजाराची रोकड व अन्य कागदपत्रांची जबरी चोरी करणार्‍या तीन जणांना नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक (arrested) केली आहे. त्यांच्याकडून चोरी झालेली संपुर्ण राक्कम तसेच इतर कागदपत्रे हस्तगत करण्यात आले आहेत. अन्य दोन संशयित आरोपी फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.८ फेब्रुवारी रोजी नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाळधी ते जळगांवदरम्यान सुरत-भुसावळ पॅसेंजरच्या जनरल बोगी नं. ०७४१०२ मध्ये बसून प्रकाश वामन पाटील (वय ४३,रा.वेलसवाडी, ता मुक्ताईनगर, जि.जळगाव) व त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक श्री.जंगले असे सुरत ते भुसावळ प्रवास करत होते.

पाळधी येथे गाडी थांबली असता श्री.जंगले हे सिटवरून उठून बाथरूमला गेले. त्यांनी श्री.पाटील यांना सांगितले की, चोरांनी त्यांचा मोबाईल शर्टाच्या खिशातून काढून घेतला आहे. फिर्यादी हे बाथरूमकडे गेले असता त्यांचे नातेवाईक जंगले यांनी मोबाईल चोराला पकडून ठेवले होते.

पकडलेल्या आरोपीताने त्यांच्याजवळील मोबाईल त्याच्या दुसर्‍या साथीदाराकडे फेकला असता तो गाडीच्या खाली पडला.पकडलेल्या आरोपीताच्या साथीदाराला चोरलेला मोबाईल परत देण्याबाबत सांगितले असता त्याने खाली पडलेला मोबाईल परत केल्याने दोघा आरोपीतांना सोडून दिले.

गाडी सुरू झाल्यावर श्री.पाटील हे नातेवाईकांंसह जागेवर येवून बसले. गाडी पाळधी येवून सुटल्यानंतर लागलीच मोबाईल चोरणारे दोघे व त्याचे इतर तिन साथीदारांनी पाटील व जंगले यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

पाटील यांनी प्रतिकार केला असता दोघानी चाकु काढला. फिर्यादी यांनी त्यांचा चाकु असलेले हात पकडून वाकवल्याने त्यांचे साथीदार आरोपीतांनी त्यांना फायटर व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पाटील यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीट काढले.

त्यात १७ हजार रूपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड, मतदान कार्ड असा एकूण माल जबरीने चोरून चैन पुलींग करून रेल्वे स्टेशन जळगांव येण्यापुर्वी गाडी थांबली असतांना उतरून पळून गेले.

याबाबत भुसावळ येथील रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंदुरबार रेल्वे स्टेशनला वर्ग करण्यात आल्याने कलम ३९५ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत नंदुरबार, भुसावळ व अमळनेर असे संयुक्त तपासात गोपनीय माहितीव्दारे तपास चक्रे तात्काळ फिरवुन सदर दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणला. सदरचा दरोडा टाकणारी टोळी लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडुन तांत्रिक व गोपनीय माहितीवरून जेरबंद करण्यात आली आहे.

सदर टोळीतील आरोपी जुबेर उर्फ डबल शेख भिकन (वय २२,रा. गेंदालाल मिल जळगांव), तन्वीर उर्फ तन्नु रहीम शेख (वय २१,रा. शिवाजीनगर जळगांव), फारूख शाह नुर मोहमद फकिर (वय २२, रा. दुध फेडरेशन, जळगांव) यांना शिताफिने अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून १७ हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड, मतदान कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच टोळीतील अन्य दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक (औरंगाबाद) गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक काजवे (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेशन अधिकारी सपोनि रमेश वावरे, असई संजय पाटील, पोहवा किरण बोरसे, पोहवा जयकुमार कोळी, पोहवा नितीन पाटील, पोना राजेश घोराडे, जितेंद्र चौधरी, भुसावळ येथील पोनि विजय घरेडे, सपोनि भाऊसाहेब मगर,

पोहवा जगदीश ठाकुर, अजित तडवी, धनराज लुले, दिवानसिंग राजपुत, सागर खंडरे तसेच रेल्वे सुरक्षा बल पोस्ट अमळनेर येथील निरीक्षक कुमार श्रीकेश, असई कुलभूषणसिंह चौहाण, हेकॉ नंदू पाटील, कॉ.सुभाषसिंह, सीआयबी सुरत हेकॉ भुपसिंह मान, हेकॉ परेश ठाकर यांनी संयुक्त पणे केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com