Video सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

घोडेबाजारात ६३ घोडयांची विक्री, २५ लाखांची उलाढाल
Video सारंगखेडा येथे हजारो भाविकांनी घेतले एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन

सारंगखेडा | वार्ताहर- SARANGKHEDA

दत्तजयंतीनिमित्त (Datta Jayanti) येथील एकमुखी दत्तप्रभूंचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्री बारा वाजेपासूनच परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. घोडेबाजारात (Chetak Festival) आज ६३ घोडे विक्री झाले असून त्यातून २५ लाख १५ हजाराची उलाढाल झाली. दरम्यान, चारशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील यात्रौत्सवाला उद्या दि. ८ डिसेंबरपासून सुरुवात होत असून येथे अठराशे घोडे दाखल झाले आहेत.

चारशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील एकमुखी दत्त प्रभूंचा यात्रोत्सव दोन वर्षाचा खंडानंतर यंदा भरणार आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे अश्व बाजाराला परवानगी मिळाली होती.

यंदाही अश्व बाजाराची तयारी पूर्ण झाल आहे. अश्व बाजारात दिवसात अठराशेहून अधिक अश्व दाखल झाले आहेत.दरम्यान दि. ८ डिसेंबर पासून यात्रोत्सव सुरु होत आहे. आज दि.७ डिसेंबर रोजी रात्री एकमुखी दत्ताची पालखी निघणार आहे. एकाच वेळी दहा हजाराहून अधिक भाविक आरतीला उपस्थित राहणार आहेत.

आज दत्त जयंतीनिमित्त पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे यात्रा बंद असल्यामुळे नागरिकांना दर्शन घेतला आले नाही. तब्बल दोन वर्षांनी यात्रा पूर्वपदावर आले असल्यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नवस फेडले व तुळा केली. तुळामध्ये केळी, गुळ, साखर आदीप्रकारे नवस फेडण्यात आले. आज सत्तर तुळा करण्यात आल्या.

दत्त जयंतीच्या पहिल्याच दिवशी घोड्यांच्या मोठ्या प्रमाणात विक्री झाली आज सर्वात जास्त किमतीच्या एक लाख पंचवीस हजाराला घोडा विक्री झाला. विक्रेता अजमेर अहमद (रा. यु.पी.) तर घोडा खरेदीदार संतोष आप्पा गोंवडे यांनी घोडा खरेदी केला.आज एकुण ६३ घोडे विक्री झाले असून त्यातून एकूण उलाढाल २५ लाख १५ हजाराची उलाढाल झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com