खान्देशातील या सुपूत्राला मिळाला देशातील सर्वात मोठ्या अश्व यात्रेचा शुभारंभ करण्याचा माऩ

खान्देशातील या सुपूत्राला मिळाला
देशातील सर्वात मोठ्या अश्व यात्रेचा शुभारंभ करण्याचा माऩ

सारंगखेडा Sarangkheda । वार्ताहर-

देशातील (country) सर्वात मोठी अश्वयात्रा (largest horse ride) असलेल्या पुष्कर (Pushkar)(राजस्थान) येथे यात्रेचा प्रारंभ (beginning of the journey) करण्याचा मान येथील चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष (President of Chetak Festival) जयपालसिंह रावल (Jaipal Singh Rawal,) यांना मिळाला.

पुष्कर येथे अश्वयात्रेला प्रारंभ झाला. राजस्थानमधील पुष्कर येथे अश्व बाजार हा सर्वात मोठा बाजार आणि यात्रा समजली जाते. घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी पुष्कर हे देशातील सर्वात मोठे ठिकाण आहे. त्यानंतर सारंगखेडा येथे अशाप्रकारे अश्व बाजार भरत असतो. पुष्कर येथील अश्व बाजार संपल्यानंतर सारंगखेडा येथील अश्व बाजारास प्रारंभ होतो. पुष्करला अश्व सोबत विविध पशू, पक्षीचीही खरेदी विक्री होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदा यात्रोत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठ्या असलेल्या अश्व बाजाराचा प्रारंभ झाला. त्यासाठी तेथील पद्धतीनुसार ध्वज लावून उद्घाटन केले जाते. या बाजाराच्या प्रारंभ यासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांना निमंत्रित करण्यात आले होते.

श्री.रावल यांनी तेथे जाऊन तेथील अश्वबाजाराची पाहणी करण्याबरोबरच सारंगखेडा येथे अश्व बाजाराची माहितीदेखील दिली. त्याचप्रमाणे अश्व बाजारात आलेल्या विक्रेत्यांना सारंगखेडा येथे येण्याचे आमंत्रणही दिले.पुष्कर यात्रोत्सावाचे प्रमुख पृथ्वीराजसिंह व जयपालसिंह रावल यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले.

पोलीस महानिरिक्षक बिजू जॉर्ज जोसफ, जिल्हाधिकारी आरती डोंगरा, प्रफुल्ल माथूर, विभागीय अधिकारी सुखाराम पिंडेल, पोलिस निरिक्षक महावीर शर्मा, तहसिलदार रामेश्वर छाबा, आरुषी मलिक आदी उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नागाडा वादक नाथूलाल सोलंकी यांची धूनं चा कार्यक्रम झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com