मोरवडच्या 85 वर्षांपासूनच्या दिवाळी आरती पूजनाचा हा आहे इतिहास...

तीन राज्यांतून येतात भाविक
 मोरवडच्या 85 वर्षांपासूनच्या दिवाळी आरती पूजनाचा हा आहे इतिहास...

बोरद Bored । वार्ताहर

तळोदा (Taloda) तालुक्यातील मोरवड (Morwad) येथे गेल्या 85 वर्षापासून (Since 85 years) सुरू असलेला अखंड दिवाळी आरती पूजन (Uninterrupted Diwali Aarti Puja) व मिरवणूक कार्यक्रम (Procession program) सोमवारी दि.24 ऑक्टोबर रोजी रंजनपुर येथे आप मूळ धर्म आप श्री. सती पती आरती पूजक आप समाज मार्फत व संत गुलाब महाराज यांचे वंशज जितेंद्र पाडवी यांनी आयोजित (organized) केला आहे. या आरती पूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत गुलाम बाबा यांचे वंशज जितेंद्र पाडवी यांनी केले आहे.

स्वातंत्र्य पूर्व काळापासून म्हणजे 1937 साली आप मूळ धर्माची स्थापना महाशिवरात्रीच्या दिवशी झाली.तेव्हापासून अखंड अशी दिवाळीच्या दिवशी आरती पूजन रंजनपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.वर्षातून चार वेळा आरती पूजन व मिरवणूक मोठ्या प्रमाणावर रंजनपूर येथे होत असते.

त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी रामदास महाराज शांत झाले होते म्हणून शांती दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. त्यानंतर आषाढ वैद्य सप्तमीच्या दिवशी गुलाम महाराज शांत झाले होते म्हणून त्या दिवशी शांत दिवस म्हणून साजरा केला जातो व दिवाळीच्या दिवशी अति उत्साह दिवस म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक संत येत असतात रात्री आठ वाजता रामदास महाराजांच्या घरापासून रामदास महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघत असते. प्रत्येक घरातील महिला ह्या आपल्या हातात ताटावर आरती घेऊन मिरवणुकीत सहभाग घेत असतात ही मिरवणूक गुलाम महाराज यांच्या घराच्या मार्गातून जात असते.

त्यांच्या घरातून गुलाम महाराज यांच्या प्रतिमा घेऊन मिरवणूक निघते व रात्री बारा वाजता समाधीस्थळी येत असते. तेथे आरती पूजन होते व प्रवचन होते गुलाम महाराज व रामदास महाराज यांची शिकवण भाविकांना सांगितली जाते नंतर महाप्रसाद दिला जातो. मिरवणुकीची समाप्ती होत असते गुलाम महाराज व रामदास महाराज यांनी घालून दिलेली ही परंपरा 85 वर्षापासून अखंड अशी गुलाम महाराजांचे वंशज व रामदास महाराजांचे वंशज संत चंद्रसेन बाबा, व संत जितेंद्र पाडवी यांनी चालू ठेवली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com