या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भगवान बिरसा मुंडा नामकरण

सभागृहाला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्याचा ग्रामसभेत ठराव
या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भगवान बिरसा मुंडा नामकरण
USER

बोरद Borad। वार्ताहर

बोरद ग्रामपंचायतीच्या (Borad Gram Panchayat)इमारतीला (building) भगवान बिरसा मुंडा भवन (Bhagwan Birsa Munda Bhavan) तर सभागृहाला (auditorium) लोहपुरूप सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांचे नाव देण्याचा ठराव (Naming resolution) येथील पहिल्याच ग्रामसभेत (first Gram Sabha)करण्यात आला.

बोरद ग्रामपंचायतीची पहिली मानसिक सभा लोकनियुक्त सरपंच अनिता मनोहर भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तत्पूर्वी नवनिर्वाचित उपसभापती तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा बोरद ग्रामपंचायत कर्मचार्‍यांकडून सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीचा पहिल्याच सभेत जन्ममृत्यूची नोंद शासनपरी पत्रकाचे वाचन व आलेल्या अर्जावर विचार करणे यांच्या सह अनेक विषरांवर खेळीमेळीचा वातावरणात पार पडली.

पहिल्याच सभेत साजन शेवाळे, गौतम भिलाव, विठ्ठल ढोढरे, ज्योतीबाई साळवे, झुलपेकार तेली, उपसरपंच निलिमा जाधव, लताबाई पवार, गायत्री भिलाव, निलुबाई ठाकरे, अनिल राजपूत यांनी बोरद ग्रामपंचायतीच्या ईमारतीला भगवान बिरसा मुंडा भवन तर आत असलेल्या सभागृहाला लोहपुरूप सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात यावे, राज्य शासनाने प्रतापगढावरील बेकायदा असलेली अफजल खानांची कबर काढण्याचा निर्णय घेतल्याने शासनाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना तळोदा पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंग राणा यांनी सांगितले, गावाच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरून कुठलाही गट तट न ठेवता सामुहिकरित्या काम करावे असे आवाहन केले. सोबतच सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक या नात्याने तो कुटुंब असतो म्हणून सरपंचाने देखील आपली जबाबदारी पार पाडत असतांना कर्तव्यांची भान ठेवणे यांची जाणीवदेखील याप्रसंगी त्यांनी करुन दिली.

कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतिष राजपूत, मंगा महाराज, निलेश राजपूत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे कर्मचारी संजय भिलाव, सुमित्रा ढोढवे, रविंद्र ठाकरे, उषा ठाकरे, उण्या ठाकरे.कांतीबाई ढोढवे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com