अरेच्च्या हे असेेही होऊ शकते : नंदुरबारात नगरसेवकाने नामांकीत उद्योगपतीची केली ‘धुलाई’

अरेच्च्या हे असेेही होऊ शकते : नंदुरबारात नगरसेवकाने नामांकीत उद्योगपतीची केली ‘धुलाई’
File Photo

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

येथील नगरसेवकाने (corporator) एका नामांकीत उद्योगपतीची (reputed industrialist) त्याच्याच कार्यालयाजवळ ‘यथेच्छ’ धुलाई (washing) केल्याची चर्चा आज शहरात दिवसभर रंगली होती. या नगरसेवकाने उद्योगपतीला का मारले (fighting)? याबाबत खमंग चर्चा सुरु आहे. याबाबत मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार अथवा फिर्याद दाखल करण्यात आलेली नव्हती.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, येथील सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने (corporator) शहरातील नामांकीत उद्योगपतीची (reputed industrialist) शहर वाहतूक शाखेजवळ असलेल्या त्याच्याच कार्यालयाजवळ फ्रीस्टाईल (Freestyle) बेदम धुलाई केली. या उद्योगपतीची पायापासून डोक्यापर्यंत यथेच्छ बदडल्याने (Breathless beating) तो चांगलाच सुजला आहे. विशेष म्हणजे संबंधीत नगरसेवक व नामांकीत उद्योगपती हे एकाच राजकीय गोटातील असल्याचे समजते.

दोघांमध्ये अंतर्गत वाद असल्याने हा वाद विकोपाला गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणावर गर्दी झाली होती. उपस्थित नागरिकांनी सदर भांडण सोडविल्याचे (Citizens settle disputes) समजते. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार अथवा फिर्याद दाखल करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, हा नगरसेवक आणि नामांकीत उद्योगपती कोण याबाबत दिवसभर चर्चा सुरु होती. आणि त्यांच्यात असा कोणता वाद (Argument) होता ज्यामुळे नगरसेवकाने उद्योगपतीला बेदम मारहाण (Breathless beating) केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com