पाठलाग करणार्‍या पोलीसांच्या वाहनाला ठोस मारून चोरटे पसार

पाठलाग करणार्‍या पोलीसांच्या वाहनाला ठोस मारून चोरटे पसार

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार शहरात आज चोरट्यांनी धुमाकुळ (Thieves swarm) घालत दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी (Burglary) करत आव्हानच (challenge) दिले.एका शिक्षकाच्या घरातून 2 लाख 40 हजाराचा ऐवज लंपास केला असून दुसर्‍या ठिकाणच्या घरफोडीबाबत उशीरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीसांनी(Police) संशयीत आरोपींचा पाठलाग ( chase the suspects) केला. मात्र पोलसांच्या हातावर तुरी देत संशयीत आरोपी गाडी टाकून पसार झाले. त्यांच्या मागावर पथके आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील शिक्षक असलेल्या किशोर माणिक रौंदळ हे आज दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वडीलांकडे श्राध्दासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपल्यानंतर ते सहारा टाऊन जवळील रूक्माई नगरातील आपल्या घरी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास परत आले असता. दरवाजा उघडा दिसला. त्यानी घरात जावुन पाहिले असता घरातील गोदरेज कपाट उघडे दिसले व त्यातील सामान जमीनीवर अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यांनतर त्यांनी पोलीसाना कळविले.पोलीसांनी पाहणी केली असता चोट्यांनी घरातून 10 हजार रूपये रोख व 2 लाख 30 हजाराचे दागिने असा एकुण 2 लाख 40 हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर माणिक रौंदळ यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत सहारा टाऊन जवळील हरिभाऊ नगरात चोरट्यांनी दुपारी पुन्हा दुसरी घरफोडी केली. याबाबत रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्र प्रक्रिया सुरू होती.

पोलीसांच्या गाडीला धडक देत चोरटे फरार

नंदुरबार येथे दोन घरफोड्या केल्यानंतर पोलीसांनी चोरट्यांचा माग काढत सिसिटिव्हीचे फुटेज तपासले. त्यात चोरटे दोंडाईच्याकडे जातांना दिसले. पोलीसानी दोंडाईचा येथे सापळा रचून बॅरीकेट्स लावले. चोरट्यांना सुगावा लागताच सारंगखेडयाकडे पसार झाले. पोलीसांनी याबाबत सारगंखेडा पोलीसांशी संपर्क केला. सारंगखेडा पोलीसांनी रस्त्यावर बॅरीकेट्स लावले. चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग करणार्‍या पोलीसांचे वाहन (क्र.एम.एच.39, ए.बी.8570) हिला चोरट्यांची कार (क्र.एम.एच.18 , डब्लु.2415) ने धडक दिल्याने पोलीस वाहनाचेही नुकसान झाले.

संशयीत चोरटे सारंगखेडा पोलीस हद्दित गाडी टाकुन पसार झाले. पोलीसांचे पथक उशीरापर्यंत त्यांचा शोध घेत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com