पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

सर्व्हिस पिस्तूलसह 30 जिवंत काडतुसे व दीड लाखांचा ऐवज लंपास
पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

शहादा Shahada । ता. प्र.

तालुक्यातील सारंगखेडा (Sarangkheda) पोलीस ठाण्यात (police station) कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी (Sub-Inspector of Police Bhagwan Koli) यांच्या शहादा येथील राहत्या घरातून (home) अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) एक शासकीय सव्हीर्स पिस्टल (Government Service Pistol) तसेच पिस्टलचे 30 जिवंत काडतुस (30 live cartridges) यांसह एक लाख 12 हजार रुपये रोख, 50 हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण 1 लाख 62 हजार (1 lakh 62 thousand compensation of Rs) रुपयांचा ऐवज चोरुन (Stolen) नेल्याची घटना घडली.

पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
Breaking News : जिल्हा दुध संघाचे एमडी  मनोज लिमयेसह चौघांना अटक

शहरातील प्रेस मारुती जवळ दीनदयाल नगरमध्ये व्यंकटेश बंगलो या घरात पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी भाडेतत्त्वावर राहतात. श्री.कोळी हे पाच दिवसांपासून रजेवर होते. कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. 13 नोव्हेंबर रोजी श्री.कोळी कुटुंबियांसह रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरी परतले. त्यावेळी स्वयंपाकगृहाचा लाईट सुरू असल्याचे बाहेरून दिसले. लाईट चालू राहून गेला असे त्यांना वाटले. परंतु मुख्य दरवाज्याजवळ आल्यावर दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. आत प्रवेश केला असता बेडरूमचाही लाईट सुरू दिसला. त्यावरून चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
# Breaking news : सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव यांच्या घरावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
देवपूरात भरवस्तीतील धोकेदायक अवैध गॅस भरणाऱ्या पंपावर छापा

चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 1 लाख 12 हजार रुपये रोख व 50 हजार रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तसेच एक 9 एम. एम. शासकीय सर्विस पिस्टल(बटक्रमांक -35) व तिचे 30 जिवंत काडतुसे (राउंड) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
Visual Story : ६ वर्ष डेट केलेल्या दीपिका-रणवीरची Untold ‘लव्ह स्टोरी'
पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
जिल्हा दूध संघात आमदार खडसेंना मोठा धक्का

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहाद्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोसई जितेंद्र पाटील आदींसह पथकाने घटनास्थळी भेट दिली. रात्रीच्या सुमारास ठसे तज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहेत.

दरम्यान, दि.8 रोजी गजानन महाराज मंदिरासमोर प्रा.वसंत रघुवंशी यांच्या घरात चोरी झाली होती. त्याचदरम्यान शहरात पाच-सहा ठिकाणी घरफोडी झाली होती. त्याचदरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com