
नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कोयन्यापाडा (Koynyapada) व चिवलउतार (Chiwaluthar) जि.प.शाळा (Zp school) फोडून चोरट्यांनी (Thieves broke) सुमारे एक लाखाचे साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील कोयन्यापाडा व चिवलउतार येथे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. सदर दोन्ही शाळेचे बंद खोलीचे कडीकोयंडा व कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला.
यावेळी कोयन्यापाडा जि.प.शाळेच्या खोलीत असलेले 18 हजार 300 रुपये किंमतीच्या दोन सोलर बॅटरी, एक इन्व्हर्टर, एक सिलींग फॅन, एक एलईडी टीव्ही व जि.प.शाळा चिवलउतार येथून 22 हजार 300 रुपये किंमतीचे बॅटर्या, एक इन्व्हर्टर, एक सिलींग फॅन, एक एलईडी टीव्ही, 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, 7 हजार रुपये किंमतीचा एक लॅपटॉप, 9 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पॅन्डल असा एकूण दोन्ही शाळेतून 86 हजार 600 रुपये किंमतीचे शालेय साहित्य चोरट्यांनी चोरुन नेले.
याबाबत राजू नामू कोकणी व चेतन विलास जोशी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक बुनकर व दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.