शहाद्यातील ऑईल मिलमधील स्पेअर पार्ट चोरट्यांना २४ तासात अटक

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शहाद्यातील ऑईल मिलमधील स्पेअर पार्ट चोरट्यांना २४ तासात अटक

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

शहादा (shahada) येथील (Oil mill) ऑईल मिलमधील मशनरी स्पेअर पार्टसचे (Spare parts) चोरट्यांना २४ तासात १ लाख ८३ हजार ७०० रूपये किमंतीच्या मुद्देमालासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकाने अटक केली आहे.

दि.३ ते ४ एप्रिल दरम्यान पंकज सुरेश जैन रा.श्रीराम कॉलनी, शहादा त यांचे शहादा शहारातील खेतीया रोड जवळील त्यांच्या मालकीचे नाकोडा ऑईल मिल येथुन फिर्यादी यांची एकुण ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा ऑईल मिलचा मशनरी स्पेअर पार्टस मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता. त्यावरुन शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यात घरफोडीचे वाढते प्रमाण पहाता प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.

त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु असतांना पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरील गुन्हा हा शहादा शहरातील संशयीत आरोपी अरमान मुख्तार शेख, शोएब शकील बागवान, इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा यांनी केला असुन ते सदर चोरी केलेला मुद्देमाल ते गरीब नवाज कॉलनी भागात विक्री करण्याचे बेतात आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि श्री. कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे १ पथक तयार करुन तात्काळ शहादा येथे रवाना केले.स्थागुशाचे पथकाने शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी भागात दोन संशयीत अरमान मुख्तार शेख रा. रहिम नगर, गरीब नवाज कॉलनी, शहादा, शोएब शकील बागवान रा. इक्बाल चौक टाऊन हॉल समोर, शहादा यांना ताब्यात घेत विश्वासात घेवुन वरील गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांचा साथीदार इम्रान ऊर्फ ईमु लंगड्या शहा रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा याच्यासह केला असल्याची कबुली दिली.

पथकाने अरमान मुख्तार शेख याच्याकडुन ८० हजार रु.किं.च्या एकुण ४ इलेक्ट्रीक मोटार तिच्यावर कंपनीचे नावाची प्लेट नसलेली एका मोटारीची किंमत २० रुपये प्रमाणे, १० हजार रु.किं.च्या. एकुण २ इलेक्ट्रीक मोटारीचे बाहेरील लोखंडी आवरण असलेली बॉडी त्यात तांब्याची तार नसलेली, ७ हजार ७०० रु.किं.ची एकुण ११ किलो तांब्याची तार प्रति किलो ७०० रुपये प्रमाणे हस्तगत केले.

शोएब शकील बागवान याच्याकडून प्लास्टीकच्या गोणीत २० हजाराच्या २ इलेक्ट्रीक मोटार, १६ हजाराची ४० फुट कॉपर केबल, गुन्हयात वापरलेली ५० हजाराची रु.किं.ची मोटार सायकल (क्र.एम.एच.१९, एस.८५०३) असा असा एकूण १ लाच ८३ हजार ७०० यांच्याकडुन हस्तगत करुन दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी (Superintendent of Police PR Patil) पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोना गोपाल हिम्मत चौधरी, पुरुषोत्तम खिमलाल सोनार,विकास हिम्मत कापुरे, पोशि यशोदिप गोपाळ ओगले चापोना रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन मुद्देमालासह आरोपी अटक करुन २४ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक, नंदुरबार विजय पवार यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.