बँकेतून पैसे काढणार्‍यांवर पाळत ठेवून चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

एक लाखाची रोकड हस्तगत
बँकेतून पैसे काढणार्‍यांवर पाळत ठेवून चोरी करणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

नंदुरबार येथे बँकेतून (Bank) पैसे काढणार्‍यांवर पाळत ठेवून (keeping watch) १ लाख रुपये चोरी (thief) करणार्‍या अल्पवयीन मुलासह (minor child) दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र शामराव मराठे (Mahendra Shamrao Marathe) रा.जगतापवाडी, नंदुरबार यांनी दि.१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पत्नीसह स्टेट बँक ऑफ इंडीया (State Bank of India) नंदुरबार येथून १ लाख रुपये बाजार व घरकामासाठी बॅकेतून काढले.

त्यानंतर त्यांनी पैसे (Money) त्यांच्या दुचाकी गाडीच्या डीक्कीमधील प्लॅस्टीकच्या पिशवीत ठेवले. महेंद्र मराठे हे बाजार करण्यासाठी नंदुरबार शहरातील नगर पालिका चौकात आले. मात्र, अज्ञात चोरट्यांनी त्यांची एक लाखाची रोकड लंपास केली.

याप्रकरणी महेंद्र शामराव मराठे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द् (Thieves) शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेमधून पैसे काढणार्‍या इसमांवर पाळत (keeps watch) ठेवून नंतर त्यांचा पाठलाग (Chase) करुन रोख रक्कम चोरी करणे या नविन गुन्हे कार्यप्रणालीची टोळी नंदुरबार जिल्ह्यात सक्रीय झाल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या लक्षात आले.

त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अपर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) विजय पवार (Vijay Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांची दोन पथके तयार केली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह बँकेमधून पैसे काढणार्‍या इसमांवर पाळत ठेवून नंतर त्यांचा पाठलाग करुन रोख रक्कम चोरी करणार्‍या गुन्हेगारांची (criminals) माहिती काढण्याचे काम सुरु केले.

अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील इंदौर, राजपूर आदी जिल्ह्यातील असून ते अल्पवयीन मुलांच्या (Minor) मदतीने या प्रकारचे गुन्हे (Crime) करतात व शहराच्या बाहेर वस्ती करून राहत असतात अशी प्राथमिक माहिती मिळाली.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाला नंदुरबार शहराच्या बाहेर वस्ती करुन राहणार्‍या इसमांची माहिती काढण्याबाबत सांगितले. अशा प्रकारचे गुन्हे करणारे व जेलमधून सुटुन बाहेर आलेल्या आरोपीतांची स्वतः देखील मध्यप्रदेश राज्यातील इंदौर आदी जिल्ह्याकडून माहिती घेतली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास केला असता पथकाला गुन्ह्याबाबत सुगावा मिळाला. दि.१६ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना शहरातील कोरीट चौफुली येथे मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील इंदौर (Indore) येथील काही उतारु आलेले आहेत व ते बँकेतील इसमावर पाळत ठेवून चोरी करणारे आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली.

ते कोरीट चौफुली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून संशयीत इसमास ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेने नंदुरबार शहरातील कोरीट चौफुली येथे जावून संशयीत तरूणाचा शोध घेतला असता संशयीत इसम एका चहाच्या टपरीवर चहा पित असतांना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधपणे चहाच्या दुकानाच्या आजुबाजुला सापळा रचला.

परंतु संशयीत इसमास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु तत्पर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने संशयीत इसमास शिताफीने पाठलाग करून निम नेमीलाल गुज्जर रा.गुरवा नगर, बिचौली मर्दाना, बिचौली खेडे, ता.जि. इंदौर, मध्यप्रदेश यास ताब्यात घेतले.

त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. अल्पवयीन साथीदार सध्या नंदुरबार शहराबाहेरील कोरीट चौफुली येथे आलेल्या उतारुंमध्ये आहे असे सांगितले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने त्याठिकाणी जावून सदर अल्पवयीन मुलाला (minor child) त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निम नेमीलाल गुज्जर व अल्पवयीन मुलाला सोबत घेवून निम नेमीलाल गुज्जर हा सध्या कोरीट चौफुली येथे राहत असलेल्या झोपडीमधून १ लाख रूपये रोख कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केले.

संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलाला (minor child) गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी महेंद्र शामराव मराठे यांना चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले गेले असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन करून आभार मानले.

आपल्या आजुबाजूला कोणी संशयीत व्यक्ती (suspect) राहत असल्यास किंवा नवीन व्यक्ती राहण्यास आल्यास त्या बाबतची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावी असे आवाहन अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना राकेश मोरे, पोकॉ अभय राजपूत, आनंदा मराठे, अभिमन्यु गावीत, पोकॉ शोएब जब्बार शेख, चापोना रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com