नंदुरबार । प्रतिनिधी NANDURBAR नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून शहादा व तळोदा येथून तीन मोटरसायकली चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस....सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील नितीननगर येथे राहणार्या भरत भोई यांची 20 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.39- एम.2102) ही अज्ञात चोरटयांनी लंपास केली.त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना जगदिश पाटील करीत आहेत.तसेच शहादा येथीलच गरीब नवाज कॉलनीत राहणार्या असरार अली मिरजान अली सैय्यद यांची मोटरसायकल अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरासमोरून लंपास केली.त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यपुढील तपास पोहेकॉ वळवी करीत आहेत.दरम्यान तळोदा तालुक्यातील राजविहिर येथे राहणार्या सुरज हिरालाल सोनवणे याची 30 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.39-पी.8439) अज्ञात चोरटयाने तळोदा येथून लंपास केली.त्यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिलीप साळवे करीत आहेत.जिल्ह्यातील मोटरसायकल चोरटयांवर पोलीसांनी वचक ठेवून त्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.