नंदुरबार-उधना मेमो रेल्वेतून युवकास फेकले

महिलेची छेड काढणाचा वाद, एकास अटक
नंदुरबार-उधना मेमो रेल्वेतून युवकास फेकले

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

महिलेची छेड (Teasing a woman) काढणार्‍यास समजविण्याचा राग आल्याने संशयीताने लाथ मारून धावत्या नंदुरबार-सुरत मेमो रेल्वेतून (Nandurbar-Surat Memo Railway) नंदुरबारच्या एका अल्पवयीन युवकास फेकून (Throwing youth) दिल्याने रेल्वेपुलाखाली पडल्याने युवकाचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना चिंचपाडा जवळ घडली. तसेच संशयीताने दुसर्‍या युवकास देखील फेकण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे गाडीतील प्रवशांनी सदर युवकास सोडविल्याने तो बचावला. प्रवाशांनी संशयीताला पकडून चिंचपाडा स्टेशन मास्तरच्या ताब्यात दिले असून याप्रकरणी त्याच्याविरूध्द विसरवाडी पोलीस (Visarwadi Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथील कुरेशी मोहल्यात राहणारा अबरार कुरेशी शेख अस्लम व मित्र फरहाज हाजी मोबीन कुरेशी हे दोघे मावशीला नवापर येथे सोडविण्यासाठी नंदुरबार ते सुरत मेमो रेल्वेने दुपारी 12.50 वाजेदरम्यान नंदुरबारहुन नवापूरकडे निघाले. या प्रवासादरम्यान रेल्वे डब्यात बसलेला एक अनोळखी इसम जोरजोरात गाणे म्हणून हातवारे करीत अबरार कुरेशी यांच्या मावशीची छेड काढीत होता. त्यावेळी अबरार कुरेशी व त्याचा मित्र फरहान कुरेशी या दोघांनी सदर इसमाला समजविले असता त्याने उलट महिलेच्या खांद्यावर हात ठेवून गाणे म्हणू लागला. त्यावेळी देखील त्यास समजविल्यावर तो तेथुन दुसर्‍या बाजुच्या दरवाज्याकडे निघन गेला. त्याठिकाणी फरहान हाजी मोबीन कुरेशी हा युवक विरूध्द दिशेला असलेल्या दुसर्‍या दरवाजाजवळ जावून उभा राहिला.

त्यावेळी संशयीत अनोळखी इसमाने त्याच्याजवळून कमरेवर लाथ मारून रेल्वे गाडीच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या फरहाज कुरेशी यास धावत्या रेल्वेतून फेकून दिले. त्यामुळे नंदुरबार ते चिंचपाडा रेल्वे रूळादरम्यान असलेल्या पुलाखाली धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी होवुन फरहाज हाजी मोबीन कुरेशी (17) रा.कुरेशी मोहल्ला,नंदुरबार या युवकाचा जागीच मृत्यू झाला. मयत युवकाला फेकल्यानंतर संशयीताने अबरार कुरेशी या युवकाला पकडन रेल्वेतून फेकण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील प्रवाशांनी संशयीताच्या ताब्यातून अबरार कुरेशी यास सोडविले रेल्वेची चैन ओढल्यानंतर रेल्वे चिंचपाडा स्थानकावर थांबल्याने प्रवाशांनी संशयीताला पकडून चिंचपाडा रेल्वे स्टेशनमास्तराच्या ताब्यात देवून घटनेबाबत सांगितले तसेच अबरार कुरेशी व काही प्रवाशांनी चिंचपाडा स्थानकाहन धाव घेत नंदुरबारच्या दिशेने येवून पाहिले असता पुलाखाली पडल्याने फरहाज कुरेशी मोबीन हा मयतावस्थेत आढळून आला. संशयीताला स्टेशन मास्ताने पोलीसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच मयत युवकाच्या नातलागांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे गर्दी झाल्याने परिसरात तणाव झाला होता.

विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलीसांच्या ताब्यात असलेल्या इसमास त्यांनी ओळखले संशयीताने संदिप गणेश वळवी रा.केलपाडा (ता.नवापूर) असे नाव सांगितले असून त्याच्याविरूध्द भादंवि कलम 302, 307, 354 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, हे.कॉ. दिनेश चित्ते, अरूण कोकणी, अतुल पानपाटील, राजेश येलवे, अनिल राठोड, पिंटू पावरा, दारासिंग पावरा, मौजु गावीत आदींनी बदांबस्त ठेवला तसेच मयत युवक फरहान कुरेशी याच्व्यावर विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करन मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मायताच्या नातेवाईकांनी विसरवाडीतील मुस्लिम समाजाचे जावेद शेख, समीर पठाण, रईस शेख, अल्ताफ बागवान, किरण सामुद्रे, सावन सामुद्रे आदींनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com