पुराच्या पाण्यात महिला वाहून गेली

नर्मदा नदीच्या फुगावटयात आढळला मृतदेह, गमन येथील घटना
 पुराच्या पाण्यात  महिला वाहून गेली

मोलगी | वार्ताहर - MOLAGI

सुनेसोबत पिण्याचे पाणी भरण्यासाठी (fill with drinking water) गेलेली महिला (woman) नदीला अचानक आलेल्या पुराच्या (flood waters) पाण्यात वाहुन (swept away) गेल्याची घटना गमन ता. अक्कलकुवा येथे घडली.

अक्कलकुवा तालुक्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

त्यामुळे नदी नाल्याना पूर आले आहे. गमन येथील दोहरीबाई वाडग्या वसावे (४५, रा.गमणचा बंगाबारी) ही महिला दि.11 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आपल्या सुनेसोबत नाल्यावर पाणी भरायला गेली होती. पाणी भरुन सुन माघारी परतली.

दोहरीबाई या देखील पाणी भरुन जाण्यासाठी निघाल्या, तेवढ्यात नाल्याला अचानक पाणी आल्याने दोहरीबाई या पाण्यात वाहुन गेल्यात. त्या नाल्यातुन वाहत जाऊन धबधब्यावरुन पडुन नर्मदा नदीच्या पाण्याच्या फुगवटयामध्ये पडल्या.

त्यांचा मृतदेह नर्मदेच्या फुगवटयामध्ये दुपारी 3 वाजेच्या सुमारास आढळला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह नर्मदा किनाऱ्यावर काढण्यात आला.

अतिवृष्टी असल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी काल नेता आला नाही. ठिकठिकाणी रस्ते बंद असल्या कारणांने प्रशासनाला ही मदतीसाठी जाता आले नाही.

दरम्यान, आज ग्रामस्थांनी पारंपारिक बांबूलन्सने सुमारे 6 ते 7 किलोमीटर पायपीट करीत मृतदेह सोगाआंबा पर्यंत आणण्यात आला.

तेथुन सहा.पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेने मृतदेह शव विच्छेदनासाठी मोलगी येथे आणला. याबाबत मोलगी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com