PHOTO गावकर्‍यांनी पाठलाग केला अन्‌ रेशन माफिया गाडी सोडून फरार

पुरवठा विभागाचे मौन, कारवाईकडे नागरीकांचे लक्ष
PHOTO गावकर्‍यांनी पाठलाग केला अन्‌ रेशन माफिया गाडी सोडून फरार

नंदुरबार | प्रतिनिधी- nandurbar

तळोदा (Taloda) तालुक्यातील अक्राणी येथील रेशन दुकानदार (Ration shopkeeper) लोकांना धान्य न देता परस्पर विकायला घेऊन जात असताना रात्री बाराच्या सुमारास गावकर्‍यांनी पाठलाग केला.चालकाने गाडी तेथेच टाकुन पळ काढल्याची घटना घडली आहे. या गाडीत गहू सापडले आहेत.

तळोदा तालुक्यातील अक्राणी (Akrani) येथील रेशन दुकानदाराने काल रात्री नऊच्या सुमारास पहिली गाडी घेऊन भरून घेऊन गेला. मात्र गावातील नागरीकांच्या लक्षात आले नाही की हा धान्य घेऊन जात आहे. असाच प्रकार दुसर्‍यांदाही घडला.

मात्र तिसरी गाडी भरली तेव्हा हा प्रकार गावकर्‍यांच्या लक्षात आल्यांनतर रात्री बाराच्या सुमारास गावकर्‍यांनी गाडीचा पाठलाग केला. या प्रकारात गाडी रस्त्यावरून खाली घसरल्याने चालकाने गाडी त्याच ठिकाणी सोडून पळून गेला. असे अवैध कारनामे करणार्‍या रेशन दुकानदाचे लायसन्स (License) रद्द करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यांचे धान्य वाटप केलं नाही अशी माहिती गावातील सुभाष वळवी यांनी दिली. रेशन दुकानदार लोकांना धान्य देत नसेल परस्पर विकून विकून खातात असाच प्रकार अनेक ठिकाणी घडतात त्यामुळे पुरवठा अधिकारी (Supply officer) व जिल्ह्याचे (Collector) जिल्हाधिकारी यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी होत आहे.ही घटना घडुनही पुरवठा विभागाने मात्र अद्याप कुठलीही कारवाई केली नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com